(Representative Image)
बीड, 5 जून : बीड (Beed) तालुक्यातील एका गावात मध्यरात्री पतीला दोरीने बांधून महिलेचा खून (Husband tied with rope and wife killed) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त सुद्धा झाले आहेत. बीड तालुक्यातील एका गावात पती-पत्नी दोन मुलांसह घरात झोपले होते. त्याचवेळी अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून पतीला दोरीने बांधले. त्यानंतर पत्नीचा खून केला अशा पद्धतीची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बीडला पाठवलेला आहे. या घटनेने खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. महिलेच्या खून प्रकरणाला वेगळे वळण मध्यरात्री पतीला दोरीनने बांधून महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून करून दरोडा झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. ज्योती दिनेश अबुज असे खून झालेल्या मयत महिलेचं नाव आहे. चार दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला गावगुंडाने पाजले विष एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती विष पाजल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. “माझ्यासोबत लग्न कर” म्हणत ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, गावातीलच नराधम गावगुंडाने विष पाजलं. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत, त्या गावगुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवत, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यात घडली. नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा देणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी, आपले आई-वडील ऊस तोडणीसाठी कारखान्याला गेल्यानंतर, चुलत्याकडे राहत होती. हीच संधी साधून गावातील गाव गुंड असणारा एक 25 वर्षीय तरुण तिची छेड काढत असे. “गेल्या दोन वर्षांपासून तो सतत तो छेड काढतोय, माझ्यासोबत लग्न कर, असं म्हणत सतत धमक्या देतोय”.