JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सांगा कसं जगायचं? पिक पाण्यात अन् दुसरीकडे कुटुंब; तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सांगा कसं जगायचं? पिक पाण्यात अन् दुसरीकडे कुटुंब; तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अतिवृष्टी आणि परतीचा पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे

जाहिरात

अतिवृष्टी आणि परतीचा पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 30 ऑक्टोबर : अतिवृष्टी आणि परतीचा पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिक पाण्यात गेल्यामुळे बीडमध्ये एका 30 वर्षे तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले कुटुंब चालवायचे कसे यावे विवंचनेतून 30 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड औरंगपूर येथे घडली. नारायण सुंदर पडूळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक पाण्याखाली गेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे या नैराश्यातून संबंधित शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितलं. (सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ) नारायण पडूळे हे अल्प भूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे दोन बँकेचे कर्ज आहे. कर्ज काढून कापसाची लागवड केली होती. मात्र गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातात तोंडाशी आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. कापूस पाण्याखाली गेल्यामुळे आता बँकांचे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून नारायण पडूळे यांनी मृत्यूला कवटाळले. नारायण पडूळे यांच्या पाश्चात वयोवृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बीड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या दिवशीही बीडमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या दरम्यान, ऐन दिवाळीत तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीडच्या केज तालुक्यातील जोला या गावात घडली होती. अतिवृष्टीमुळे २ एकर सोयाबीन खराब झाली. कुटुंब जगवावं कसं, कर्ज फेडावं कसं या विवंचनेतून ३१ वर्षीय तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. बीडच्या केज तालुक्यातील जोला या गावातील घटनेनं अतिृष्टीमुळे शेतकऱ्याचा धीर खाचतोय. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी टोकाचे पाऊल उचलले हे रोखण्याठी शासन अपयशी होत आहे. गणेश मारूती सारूक असं आत्महत्या केल्याचे शेतकऱ्याच नाव आहे. (कैलास पाटलांना उपोषण सोडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन; चर्चेनंतर पाटील म्हणाले..) कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या