'नेरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा जो आदेश आहे, तो आधी वाचून बघा आणि...'
बीड, 31 डिसेंबर : ‘‘नेरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा जो आदेश आहे, तो आधी वाचून बघा आणि मग नेरेटिव्ह सेट करा. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत रॅलीच्या समारोप प्रसंगी देवेंद्र फडणवीस सहभागी बोलत होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी अनिल देशमुख यांच्या सुटकेवर भाष्य केलं. (बीडमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनी फिरवली पाठ, राजकीय चर्चांना उधाण) ‘नेरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा जो आदेश आहे, तो आधी वाचून बघा आणि मग नेरेटिव्ह सेट करा. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भात तपासी यंत्रणाचा गैरवापर यासंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. (देशमुख, मलिक आणि राऊतांना का अटक केली? शरद पवार स्पष्टच बोलले) तसंच, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केलं राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीच रक्षण त्यांनी केलं धर्मांतरण करा हे त्यांनी कधीच मान्य केलं नाही. स्वदेश स्वभूमी आणि स्वधर्म याकरता हालअपेष्टा सहन करुन त्यांच बलिदान झालेल आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे झाले पण तरीदेखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते, असंही फडणवीस म्हणाले ‘2022 मध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनाला इन्फेक्शन झाले होते ते दूर करण्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश आले आहे. 2023 सालामध्ये महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचं काम आमच्या सरकार नक्कीच करेल’ असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पाकिस्तानचे छुपे युद्ध.. अमली पदार्थांची तस्करी केली जाते. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पाठवलं. हे पाकिस्तानचे छुपे षड्यंत्र आहेत. याच्या विरोधात लढावं लागेल. हळू भारत कॅन्सरची राजधानी बनतेय, तो गुटखा, तंबाखू, खरा, यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. व्यसनापासून दूर जाण्याची प्रयत्न केला पाहिजे. आता अमली पदार्थ विरोधी मोठी लढाई सुरू करण्याचे आवाहन केले. याला पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.