JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काल भारत-पाक सामन्यात मेलबर्न स्टेडियममध्ये बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली, मुख्यमंत्र्यांचा दावा

काल भारत-पाक सामन्यात मेलबर्न स्टेडियममध्ये बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली, मुख्यमंत्र्यांचा दावा

‘आम्हीही 3 महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आणि राज्यात विकासाचं पर्व सुरू’

जाहिरात

आम्हीही 3 महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आणि राज्यात विकासाचं पर्व सुरू

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 23 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियमवर भारताने पाकिस्तानला लोळवून दणदणीत विजय मिळवला. या स्टेडियमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे चाहते पोहोचले होते, त्यांच्या हातात बॅनर होते, असा दावाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या. ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित कण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

‘देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ठरवलं, सर्व सण साजरे करायचे. मग गोविंदा असेल, दसरा असेल किंवा दिवाळी असेल. आपण इंडिया पाकिस्तानची मॅच जिंकली. काय जल्लोष केला काल सर्वांनी. मेलबॉर्न स्टेडिअमवर बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली होती. कुणाच्या तरी हातात, आमच्या पक्षाचे बॅनर होते. आम्हीही 3 महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आणि राज्यात विकासाचं पर्व सुरू’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला. ( पीक कुठे येतं हे माहितीये का? उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर भाजपचा निशाणा ) काल झालेल्या मेलबर्न स्टेडियमवर सामन्यादरम्यान, एक कार्यकर्ता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पोस्टर घेऊन उभा असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ‘वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे - बाळासाहेबांची शिवसेना दिवा शहर’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिला होता. या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आंदोलन दरम्यान, बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी राज्यभर कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहतात, आजही त्यांनी चर्चा होईल असंच काही केलं आहे. सत्तेत असताना ही त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे, शेतकरी अतिवृष्टीमुळे हताश झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्याच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार संजय गायकवाड यांनी चटणी भाकर खाऊन एक अनोखे आंदोलन केलं. ( उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर, सासवडमध्ये करणार पाहणी ) शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामे झाले मात्र मदत मिळाली नाही. त्यासाठी आज आमदार गायकवाड यांना आंदोलन करावं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाऊन ठाकरे यांच्यावरच जहरी टीका केली होती. मात्र आता शिंदे गटात असून ही सत्तेत असून ही संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं शेतकऱ्यांना सोबत घेऊन चटणी भाकर खाऊन आंदोलन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या