JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोंडेश्वरमध्ये वाढदिवस सेलिब्रेशनसाठी आले अन् चारही मित्रांचा बुडून मृत्यू, कुटुंबाला धक्का!

कोंडेश्वरमध्ये वाढदिवस सेलिब्रेशनसाठी आले अन् चारही मित्रांचा बुडून मृत्यू, कुटुंबाला धक्का!

दिवाळीनिमित्त घराघरांमध्ये आनंद साजरा केला जात असताना या कुटुंबांना जबर धक्का बसला आहे,

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बदलापूर, 21 ऑक्टोबर : बदलापूराजवळील कोंडेश्वरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पावसाळ्याच्या दिवसात प्रवेशात बंद असते. आतापर्यंत अनेकवेळा तेथे झालेल्या अपघातांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना तेथे जाण्यापासून मज्जाव केला जातो. मात्र तरीही अनेकजण नियम मोडून तेथे जात असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान बदलापुर-कोंडेश्वर धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. हे चौघेजण घाटकोपरहून कोंडेश्वर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. पावसाळ्यात धबधब्यावर मनाई असतानाही हे तरुण कसं आले याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरने घेतली 23 व्या मजल्याहून उडी, सुसाईड नोटमधून कारण समोर वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असताना कोंडेश्वरच्या धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. स्थानिक गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढले आहेत. धक्कादायक म्हणजे हे चौघेजणं अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या