JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...अजून 24 तास बाकी, रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू यांचे सूचक विधान

...अजून 24 तास बाकी, रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू यांचे सूचक विधान

‘मी वाद सुरू केला नाही. मी गप्प रहायला हवे होते का? मी कार्यकर्त्यांशी बोलून उद्या मंगळवारी माझी भूमिका मांडणार आहे’

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर : अमरावतीचे आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यामधील वादावर अखेरीस पडदा पडला आहे. रवी राणा यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तर, मी वाद सुरू केला नाही. मी गप्प रहायला हवे होते का? मी कार्यकर्त्यांशी बोलून उद्या मंगळवारी माझी भूमिका मांडणार आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटवण्यासाठी रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मी वाद सुरू केला नाही. मी गप्प रहायला हवे होते का? मी कार्यकर्त्यांशी बोलून उद्या मंगळवारी माझी भूमिका उद्या मंगळवारी मांडणार आहे. माझ्यावर कोणी कितीही आरोप केले तरी गप्प राहून माझी संघटना संपवायची होती का? असा सवालच कडू यांनी उपस्थितीत केला. (फडणवीसांनी केली कानउघडणी, रवी राणा ‘गुवाहाटी’वरून नरमले, व्यक्त केली दिलगिरी!) मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून उद्या माझी भुमिका मांडणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या जिवावर इथं पर्यंत आलो आहे. त्यामुळे मला त्यांचे मत विचारात घेणे भाग आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे मला आताच सांगता येणार नाही. 24 तास शिल्लक आहेत. तेव्हा भुमिका सांगू, असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. (पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली, महसूल मंत्री विखेंच्या जिल्ह्यातला LIVE VIDEO) दरम्यान, मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी रवी राणा माफी मागणार का? असा सवाल कडू यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे आज सायंकाळी अमरावतीत कडू कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहे. कालच्या बैठकीत आमदार रवी राणा यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्मंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या