औरंगाबाद, 9 नोव्हेंबर : औरंगाबाद च्या साई इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राचार्याने कॉलेजातच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्राचार्याने कॉलेजमधील तब्बल 10 लाखांची रक्कम चोरली होती. संस्था चालकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. पण, त्याने विश्वासघात केला. प्राचार्याने कॉलेजात चोरी का केली ? त्याचा चोरीनंतर काय बेत होता ? पोलिसांनी तो बेत कसा उधळला? ही सर्व माहिती आता उघड झाली आहे. काय घडला प्रकार? औरंगाबाद पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार शहरातील चिखलठाणा एमआयडीसी भागामध्ये असलेल्या या कॉलेजला 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉलेजच्या सीसीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआरसह तब्बल 10 लाखांची चोरी झाल्याचं लक्षात आलं. याबाबतची तक्रार कॉलेजच्या वतीनं शहरातील एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं हाती घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी तपास सुरू केला. चोरी करणारी व्यक्ती ही कॉलेजच्या आतीलच असल्याचं या तपासाच्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं. ही चोरी रात्री 11 नंतर घडल्याचा अंदाज पोलिसांना आला. त्यांनी याबाबत प्राचार्य निलेश आरकेची चौकशी केली. त्यावेळी त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. चालक ढाब्यावर गेला, चोरट्यांनी कंटेनर खाली केला, तब्बल 9 लाखांची चहापत्ती चोरली! कसा सापडला जाळ्यात? कॉलेजला सुट्टी लागली त्या दिवशी शेवटी कोण आलं होतं याची चौकशी पोलिसांनी केली. त्यामध्ये संस्थाचालक विक्रांत जाधव यांनी कॉलेजच्या ऑनलाईन कामासाठी निलेश आरकेला बोलावलं होतं. यावेळी महाविद्यालयाच्या चार कुलपाच्या चाव्यांपैकी तीन चाव्या महाविद्यालयाकडे तर एक चावी निलेश अरके याच्याकडे असल्याचे तपासामध्ये समोर आलं आणि पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. कॉलेजमधील पैशांची चोरी करणारा निलेश आंबेडकर नगर येथील घरातून पळून जाण्याची तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आंबेडकर नगर येथे सापळा रचला दरम्यान बॅग घेऊन निघालेला निलेश याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्याचे तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडलं. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक, हवालदारालाही मारहाण पोलिसांनी निलेश याच्याकडे प्रश्नांची सरबत्ती केली. निलेशच्या उत्तरात विसंगती आढळल्यानं तो पकडला गेला. चोरी केलेल्या दहा लाखांपैकी त्याने पाच लाख आठ हजार रुपये सोबत ठेवले होते. मोबाईलच्या ऑनलाइन गेममध्ये त्यानं 3 लाख रुपये उडवल्याची कबुली दिली.