JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : अनाथाश्रमात राहिली, नवऱ्यानं सोडलं तरी 'ती' पहिल्याच प्रयत्नात झाली पोलिसात भरती, Video

Aurangabad : अनाथाश्रमात राहिली, नवऱ्यानं सोडलं तरी 'ती' पहिल्याच प्रयत्नात झाली पोलिसात भरती, Video

बालपण अनाथ आश्रमात, वयात आल्यानंतर लग्ना झालं. दोन मुलं झाली पतीने तू काळी असल्याचे सांगत सोडून दिलं. मात्र, आयुष्यात आलेल्या या संकटावर खचून न जाता यावर मात करत कविता साळुंखे यांनी पोलीस खात्यात नोकरी मिळवली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 11 ऑक्टोबर :  संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मात्र, त्या संकटांवर मात करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही संकटांवर सहज मात करू शकता. याचेच उदाहरण औरंगाबाद शहरातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या कविता साळुंखे यांनी दिले आहे. बालपण अनाथ आश्रमात, वयात आल्यानंतर लग्न झालं. दोन मुलं झाली पतीने तू काळी असल्याचे सांगत सोडून दिलं. मात्र, आयुष्यात आलेल्या या संकटावर खचून न जाता यावर मात करत त्यांनी जिद्दीने पोलीस खात्यात नोकरी मिळवली. आज त्या स्वतःच्या घरात दोन मुलांचा सांभाळ करून स्वाभिमानाने आयुष्य जगत आहेत. कविता साळुंखे यांची यशोगाथा खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मूळच्या जळगाव जिल्ह्यातील कविता साळुंखे. साधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला आई-वडील दोघेही मोलमजुरी करायचे. आई-वडिलांना पहिल्या दोन मुली झाल्या त्यानंतर मुलगा झाला. यावेळी आत्याला वाटलं चौथा मुलगा व्हावा म्हणजे हुंडा देण्याची गरज भासणार नाही. मात्र चौथ्यांदा म्हणून कविता यांचा जन्म झाला. याचा राग आत्याला आला. आत्यानी त्यांना लहानपणीच मारून टाकण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या आईला आणि घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेला कळाले. हेही वाचा :  Success Story: झोपडपट्टीत शिक्षण, 16 फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रिया; जिद्दीने ‘ती’ झाली IAS ऑफिसर यावेळी घराशेजारी राहणाऱ्या महिलेने कविता यांच्या आईला सांगितले की, कविताला तुम्ही इथून कुठेतरी राहण्याची व्यवस्था करा. दरम्यान कविता यांच्या आईने मावशीकडे त्यांना ठेवलं. मावशीकडे त्यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं. मात्र, मावशीची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आईनं त्यांना अनाथ आश्रमामध्ये सोडलं. अनाथ आश्रममध्ये त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं बारावीला असताना 2009 मध्ये कविता यांचे लग्न झालं. पती औरंगाबाद शहरातील एका कंपनीमध्ये नोकरीला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता त्यानंतर पहिला मुलगा आणि नंतर मुलगी झाली. पतीचे शब्द ऐकून पायाखालची जमीन सरकली पहिला मुलगा आणि नंतर मुलगी झाल्यानंतर मात्र पतीच्या वागण्यात बदल झाला. तो नेहमी त्रास द्यायला लागला. मी तरीही सर्व काही सहन करत त्यांच्यासोबत चांगले  वागण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मी एका नात्यातील लग्नासाठी माहेरी गेले यावेळी माझ्यासोबत दोन्ही मुलंही होते. मात्र, पती घरीच होता लग्न झाल्यानंतर मी माहेराहून औरंगाबादला परतले घरी येऊन बघितल्यानंतर घराला लॉक होतं पती मात्र घरी नव्हते. यावेळी मी घराची मालकीण यांना विचारलं त्या म्हणाल्या की तुमचे पती आत्ताच सकाळी गेलेत. बरेच दिवस झाले दरम्यान मी शोधा शोध घेतला की ते त्यांच्या बहिणीच्या घरी आहेत. मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला तर ते मला म्हणाले की तू काळी आहेस मला तुझ्या सोबत संसार करायचा नाही. पतीचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, असं कविता सांगतात. हेही वाचा :  Success Story : लाकडातून साकारल्या भन्नाट कलाकृती, विदेशातही होतेय दमदार विक्री, Video पहिल्याच  प्रयत्नामध्ये मिळाली नोकरी  सुरुवातीचे तीन महिन्याचे भाडे देखील थकलेले होते. यामुळे घर मालकीण पैशासाठी तगादा लावत होती. यावेळी मी एका रुग्णालयामध्ये काम करत होते काम करून घर सांभाळून मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवत होते. कामावर जात असताना मला रस्त्यात एक स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीची रिक्षा दिसली मी तिथे जाऊन विचारलं असता त्यांनी मला भेटायला बोलावलं मी तिथे गेल्यानंतर त्यांना परिस्थिती सांगितली. यावेळी स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन सोनवणे सर यांनी मला प्रोत्साहन देत माझ्या परिस्थितीला अनुसरून उदाहरण सांगितले. त्यामुळे मी जिद्दीने तयारी केली आणि पहिल्याच सहा महिन्याच्या प्रयत्नामध्ये मला 2016 मध्ये पोलीस दलामध्ये नोकरी लागली. सध्या मी औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत आहे. आता मी स्वतःचे घर घेतले आहे. मुलांसोबत मी आता आनंदाने जगत आहे असंही कविता सांगतात. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न एवढ्या कठीण प्रसंगांमध्ये मला माझ्या जिद्दीवर नोकरी मिळवता आली. आता यापुढे माझं भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचंही कविता साळुंखे सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या