JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'बाळासाहेबांच्या नावाचा धड उल्लेख करू शकत नाहीत त्यांनी...', शिवसेनेचा नड्डांवर घणाघात

'बाळासाहेबांच्या नावाचा धड उल्लेख करू शकत नाहीत त्यांनी...', शिवसेनेचा नड्डांवर घणाघात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नड्डा यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंवर टीका केली, नड्डा यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.

जाहिरात

ठाकरेंच्या शिवसेनेचा जेपी नड्डांवर पलटवार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 2 जानेवारी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकलं आहे, त्याचाच भाग म्हणून जेपी नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाल्या. या सभांमधून जेपी नड्डा यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 2019 निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही घोषणा केली होती, पण उद्धव ठाकरेंनी खुर्चीच्या लालसेपोटी धोका दिला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मागे टाकत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली, अशी टीका जेपी नड्डा यांनी केली. जेपी नड्डा यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!’, असं ट्वीट शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

अंबादास दानवे यांनी जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंबादास दानवे यांनी नड्डा यांच्या भाषणावेळच्या रिकाम्या खुर्च्या दाखवल्या. ‘जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणे! सर्वाधिक रिकाम्या खुर्च्या असल्याचा विक्रम पण आज भाजप च्या नावे नोंदवला गेला असावा’, असं टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

जाहिरात

‘अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे’, असंही अंबादास दानवे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या