JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरेंना देव पावला, म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी, स्वत:चं हक्काचं घर होणार

शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरेंना देव पावला, म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी, स्वत:चं हक्काचं घर होणार

शिवसेनेचे सध्याचे बंडखोर नेते आणि कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. कारण त्यांना म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी लागली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 24 जून : प्रत्येक सर्वसामान्याचं आपल्या हक्काचं एक घर असावं असं स्वप्न असतं. पण आता घरांच्या किमती वाढल्याने अनेकांना हे स्वप्न पूर्ण करण्यात आपली संपूर्ण हयात घालवावी लागते. खूप कष्ट करुन सर्वसामान्य व्यक्ती आपल्या स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करते. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना अल्पदरात घर मिळावं यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. म्हाडा हा त्याचाच एक भाग. म्हाडाकडून सर्वसामान्यांसाठी अल्पदरात घर उपलब्ध करुन दिले जातात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याची लॉटरी जाहीर होते. म्हाडाच्या या योजनेतून हजारो नागरिकांना कमी किंमतीत स्वत:चं हक्काचं घर घेता येतं. अनेकांचं स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होतं. असंच एक स्वप्न राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं देखील साकार झालं आहे. शिवसेनेचे सध्याचे बंडखोर नेते आणि कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. कारण त्यांना म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी लागली आहे. म्हाडाच्या आमदार कोट्यातून त्यांना ही लॉटरी लागली आहे. भुमरे यांनी अल्प उत्पन्न गटातून चिकलठाणा येथील सदनिकासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे. ( बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, 48 तासांत द्यावं लागणार उत्तर ) औरंगाबादच्या चिकलठाणा येथे म्हाडाच्या 1200 सदनिकांचा प्रकल्प आहे. या सदनिकसांठी नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने सोडत घेण्यात आली होती. म्हडाच्या नियमानुसार या सदनिकांमध्ये लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेच्या विद्यमान आणि माजी सदस्यांसाठी दोन टक्के सदनिका राखीव ठेवल्या जातात. याच आमदारांसाठीच्या राखीव कोट्यातून संदीपान भुमरे यांना घराची लॉटरी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याकडे खरंच स्वत:चं घर नव्हतं का? असेल तर मग त्यांना म्हाडाच्या राखीव कोट्यातून घर घेण्याची गरज का भासली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या