हा अपघात हा ed मय भाजपच्या सरकारचे पाप आहे. कारण राज्यात
औरंगाबाद, 08 ऑक्टोबर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी बसला आग लागल्यामुळे 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात हा ed मय भाजपच्या सरकारचे पाप आहे. कारण राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक आपले जीव गमावत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नाशिक -औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या अपघातात बस मधील जवळपास सात ते आठ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. (मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, VIDEO) हा अपघात हा ed मय भाजपच्या सरकारचे पाप आहे. कारण राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक आपले जीव गमावत आहे.खड्डे मय रस्त्यांना हे सरकार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेऊ पण… महाविकास आघाडीला सेक्युलर विचाराचे जो कुणी पाठिंबा देईल तो आम्ही घेऊ. मात्र हा निर्णय घेण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक नेत्यांशी बोलावे. त्यामुळे निर्णय चांगला घेतला जाईल. आंबेडकर यांना दिल्लीशी बोलायचे असेल तर त्यांनी तेही करावे मात्र निर्णय स्थानिक नेत्यांशी बोलल्यावरच होईल, असंही नाना पटोले म्हणाले. ( शिंदे गटाच्या मेळाव्यातून परतताना धरणात उडी; 26 तासानंतर या अवस्थेत सापडला ) चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आश्चर्यकारक वाटते. आमच्या आई वडिलांना शिव्या दिल्या तरी चालतील मात्र अमित शहा आणि नरेंद्र मोदींबद्दल ऐकून घेणार नाही असे म्हणणे आपल्या हिंदुत्वमध्ये बसत नाही. आपल्या हिंदुत्व मध्ये आई-वडील सर्वोच्च स्थानी आहेत, असा टोला नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. नाशिक बस अपघातातील मृतांचा वारसांना 5 लाखांची मदत दरम्यान, नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.