JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : पैसे दिले नाही म्हणून वर्गमित्राच्या आईसोबत धक्कादायक कृत्य, CCTV मुळे घटनेचा खुलासा

Aurangabad : पैसे दिले नाही म्हणून वर्गमित्राच्या आईसोबत धक्कादायक कृत्य, CCTV मुळे घटनेचा खुलासा

हलिमा शेख आणि आरोपी राजू दोघं नातेवाईक असल्यामुळे हलिमाला वडिलांकडून मिळालेली जमीन राजूच सांभाळायचा.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 5 जून : जिल्ह्यातील पैठण (Paithan) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका 65 वर्षीय महिलेचा खून (Murder) करण्यात आला आहे. महिलेच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता टाकून तिचा खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे घटना - हलीमा वजीर शेख (वय 65 वर्षे, रा. जांभळी,ह.मु. बिडकीन ) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी घरात आढळून आला होता. त्यांच्या डोक्याला जोरदार मारहाण केल्याचे यावेळी पाहायला मिळाले होते. तसेच घरातील बेड सुद्धा पेटवला होता. या घटनेची माहिती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात त्यांना एक व्यक्ती रात्री तीन वाजेच्या सुमारास मृत महिलेच्या घराकडे जात असल्याचे दिसले होते. पोलिसांनी अधिक कसून तपास केला असता आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. राजू ईसाक शेख असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मृत महिलेचा मुलाचा वर्गमित्र आहे. हत्येचे कारण काय - बिडकिन पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर हत्येचे कारण समोर आले आहे. मृत महिला हलिमा शेख आणि आरोपी राजू दोघं नातेवाईक असल्यामुळे हलिमाला वडिलांकडून मिळालेली जमीन राजूच सांभाळायचा. काही वर्षांपूर्वी शासकीय प्रकल्पात मृत महिलेची जमीन गेली. यामुळे तिला मोठा मोबदला मिळाला होता. त्यामुळे तिच्याकडे सोने आणि बरेच पैसे झाले होते. हे सर्व पाहून आरोपी राजूची नियत फिरली होती.   पुणे हादरलं! भल्या पहाटे तरुणासोबत रस्त्यात धक्कादायक कृत्य, मित्राची गर्लफ्रेंड पटवल्याचा राग रात्री 1 वाजता गेला घरी - त्याने गेल्या काही दिवसांपासून महिलेकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, हलिमा यांनी त्याला नकार दिला होता. त्यामुळे तो संतापला होता. 1 जूनला रात्री तीन वाजेच्या सुमारास तो हलिमा यांच्या घरी गेला. यावेळी सुद्धा रात्री त्याने पुन्हा पैशाची मागणी केली. मात्र, त्याला यावेळीही नकार मिळाला. म्हणून रागाच्या भरात त्याने किचनमधील खलबत्ता घेतला आणि हलीमा यांच्या डोक्यात जोरात टाकत त्यांची हत्या केली. इतकेच नव्हे तर घरातील बेडही जाळला. यानंतर अंगावरील सोनं घेऊन फरार झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या