JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पत्नीच्या प्रियकराचं ते वाक्य जिव्हारी लागलं, औरंगाबादमधील पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

पत्नीच्या प्रियकराचं ते वाक्य जिव्हारी लागलं, औरंगाबादमधील पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

पत्नीच्या प्रियकराच्या धमकीमुळे घाबरलेल्या पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील नारेगावमध्ये उघडकीस आली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, औरंगाबाद 20 डिसेंबर : औरंगाबादमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पत्नीच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासामुळे एका पतीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीच्या प्रियकराकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक आहे की सैतान? 10 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत पहिल्या मजल्यावरुन फेकलं; आईसोबतही.. पत्नीच्या प्रियकराच्या धमकीमुळे घाबरलेल्या पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील नारेगावमध्ये उघडकीस आली. घरासमोर राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने पतीला धमकी दिली होती. ‘तुझी पत्नी माहेरी का पाठवली? तिला घेऊन ये, नाहीतर तुला मारून टाकेल’ अशी धमकी प्रियकराने महिलेच्या पतीला दिली होती. या धमकीमुळे घाबरलेल्या पतीने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. अर्जुन रावसाहेब भिसे असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. तर आकाश साळुंके असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे. मृतदेहाचे 20 तुकडे करण्यासाठी 20 हजारांत सौदा, पोलिसांना अजूनही सापडत नाही शीर! दिल्लीतील पित्याचं धक्कादायक कृत्य - पती-पत्नीमधला वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात. असंच एक प्रकरण नुकतंच दिल्लीमधूनही समोर आलं होतं. दिल्लीतल्या कालकाजी भागात एक विचित्र घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत पती त्याच्या पत्नीला घ्यायला सासरी गेला; पण तिथे दोघांत वाद झाला आणि राग अनावर झाल्याने पतीने त्याच्या दोन वर्षीय मुलाला उचलून तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं. नंतर स्वत:ही उडी घेतली. गंभीर जखमी बाप-लेकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या