JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : शिवाजी महाराजांपासून मिळाली तलवारबाजीची प्रेरणा, औरंगाबादच्या वैदेहीनं पटाकवलं गोल्ड

Video : शिवाजी महाराजांपासून मिळाली तलवारबाजीची प्रेरणा, औरंगाबादच्या वैदेहीनं पटाकवलं गोल्ड

नवोदित खेळाडूंना संधी देणारी स्पर्धा अशी राज्य ऑलिम्पिकची ओळख आहे. या स्पर्धेत औरंगाबादच्या वैदेही लोहियानं गोल्ड मेडल मिळवलंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 12 जानेवारी : नवोदित खेळाडूंना संधी देणारी  स्पर्धा अशी राज्य ऑलिम्पिकची ओळख आहे. या स्पर्धेत औरंगाबादच्या वैदेही लोहियानं तलवारबाजीमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. या स्पर्धेत राज्यातील मातब्बर स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये वैदेहीनं बाजी मारलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुलावरती राज्य ऑलिंपिक तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तलवारबाजीमधील वेगवेगळे सामने जिंकत वैदेहीनं फायनलमध्ये प्रवेश केला. वैदेहीची फायनलमध्ये लढत कोल्हापूरच्या अंकिता सोळंकीशी होती. वैदेहीनं या फायनलमध्ये पहिल्यापासूनच वर्चस्व राखत विजय मिळवला. शिवाजी महारांपासून मिळाली प्रेरणा वैदहीला लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि चित्रपट बघण्याची आवड होती. यामधूच तिला तलवारबाजीची आवड निर्माण झाली. तिनं वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत तलवारबाजीचा सराव केला. वैदेहीला या सरावाचं फळ राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत मिळालं. तरूण खेळाडूच्या करिअरला Jellyfish चा दंश, 7 वेळा करावं लागलं ऑपरेशन, Video प्रत्येक मॅचच्यापूर्वी खेळाडूला दडपण असतं तसं मलाही होतं.  माझ्या शिक्षकांनी माझ्याकडून जो सराव करून घेतला होता. त्यांनी मला शिकवलेल्या टेक्निकमुळे फायनलमध्ये विजय मिळवता आला, याचा अभिमान आहे. मला भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत मेडल जिंकायचं आहे,’ अशी भावना वैदेहीनं व्यक्त केली.

वैदेही लहानपणापासूनच शाळा आणि खेळामध्ये हुशार आहे. ती या दोन्ही गोष्टी उत्तम पद्धतीनं हातळले. आम्हाला तिचा अभिमान असून ती भविष्यात तिचं ध्येय पूर्ण करेल असा विश्वास आहे, असं वैदेहीचे वडील संजय लोहिया यांनी सांगितलं. अनेक वेळा काम करून किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे ती थकलेले दिसते. त्यावेळी मी तिला आराम करण्यास सांगते. पण, वैदेही सराव आणि अभ्यासात अजिबात तडजोड करत नाही. त्याचं महत्त्व आत्ता कळतंय, असं तिच्या आई कविता लोहीया यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या