महिलेनं नोकरी सोडून शेतात उभारलं रिसाॅट, आता लाखोंमध्ये कमाई..

आजूबाजूला हिरवेगार शेत, बोटिंग, स्विमिंग पूल, खेळण्याचं साहित्य आणि चुलीवरच जेवण असं ठिकाण असेल तर सहलीची किंवा फिरायला जायची मजाच भारी.

सुंदर असं पिकनिक डेस्टिनेशन अहमदनगर जिल्ह्यातील मुळा डॅमच्या परिसरात वसलेले एका निसर्गरम्य बेटावर आहे.

एका शिक्षिकेच्या संकल्पनेतून हे आकर्षक ठिकाणं उभं राहिलं आहे. 

अहमदनगरमधील सुप्रिया भुजबळ या पेशाने शिक्षिका होत्या. मात्र, त्यांच मन नोकरीत काही रमलं नाही.

स्वतःचं काही तरी व्यवसाय करावा अस त्यांना मनोमन वाटत होते. यातून त्यांना पिकनिक पॉईंटची कल्पना सुचली. 

नोकरी सोडून मुळा धरणाच्या मागील बाजूला डोंगराळ भागात  शेत विकत घेऊन सुरुवातीला शेती केली. फळ भाज्या पिकवल्या. अनेक जण ही शेती पाहायला येऊ लागले. 

पाण्याच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मोठ्या होडीची सोय करण्यात आली. नंतर या शेतीच त्यांनी गार्डन केलं.

12 वर्षा पूर्वी सुरू केलेला हा प्रवास आता रिसॉर्ट पर्यंत आला आहे. यातून लाखोंची कमाई होत आहे.