JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पती-पत्नीचे क्षुल्लक कारणावरुन भांडण; पत्नीने चार वर्षाच्या मुलासह उचलले टोकाचं पाऊल

पती-पत्नीचे क्षुल्लक कारणावरुन भांडण; पत्नीने चार वर्षाच्या मुलासह उचलले टोकाचं पाऊल

बानोबी शहजान आणि त्यांचे पतीन शहाजान शहा या दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन सोमवारी सायंकाळच्या सुमारास भांडण झाले होते. याच भांडणाचा राग बानोबी शहा यांनी मनात धरल आणि त्यानंतर एक धक्कादायक आणि अत्यंत टोकाचे पाऊल उचचले.

जाहिरात

फोटो क्रेडिट - लोकमत

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 1 जून : पती-पत्नीमध्ये भांडण (Husband Wife Dispute) होत असते. मात्र, काही वेळा या भांडणाचा परिणाम फार धक्कादायक होतो, याबाबतही तुम्ही वाचले असेल. असेच एका पती-पत्नीचे भांडण झाले होते. या भांडणाचे रुपांतर मात्र, एका धक्कादायक घटनेत झाल्याचे समोर आले आहे. काय आहे नेमकी घटना? पती-पत्नीचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून एका महिलेने तिच्या चार वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. बाबोनी शहाजान (वय 30) आणि अल्तमश शहाजान शहा, अशी मृतांची नावे आहेत. ही धक्कादायक घटना पैठण (Paithan) तालुक्यातील कारकीन शिवारात घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारा ती उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात (Midc Paithan Police Station) नोंद झाली आहे. बानोबी शहजान आणि त्यांचे पतीन शहाजान शहा या दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन सोमवारी सायंकाळच्या सुमारास भांडण झाले होते. याच भांडणाचा राग बानोबी शहा यांनी मनात धरल आणि त्यानंतर एक धक्कादायक आणि अत्यंत टोकाचे पाऊल उचचले. त्यांनी आपला चार वर्षांचा मुलगा अल्तमशला घेऊन मध्यरात्री स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मायलेकाची शोधाशोध सुरू  दरम्यान, बानोबी आपल्या मुलासह गायब झाल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. त्यांनी मंगळवारी सकाळी पती शहाजान सह शेजाऱ्यांनीही त्यांचा शोध घेतला. मात्र, बानोबी आणि अल्तमश मिळून आले नाहीत. याचदरम्यान, नातेवाईकांकडेही शोध सुरू होता. मात्र, तिथे त्या नसल्याची माहिती मिळाली. हेही वाचा -  पत्नीसोबत 63 वर्षीय वृद्धाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतापला पती, धक्कादायक शेवट!

विहिरीत तरंगताना दिसला मृतदेह -

यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारच्या सुमारास काही स्थानिकांना एका विहिरीतील पाण्यात मृतदेह तरंगतात दिसून आले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मायलेकांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या