JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तब्बल 20 फूट खोल नदीत पडली कार, जायकवाडीच्या पायथ्याशी घडली दुर्घटना

तब्बल 20 फूट खोल नदीत पडली कार, जायकवाडीच्या पायथ्याशी घडली दुर्घटना

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

जाहिरात

अपघातग्रस्त वाहन

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 23 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पुलावरून कार पाण्यात कोसळली. तब्बल 20 फूट खोल नदीत ही कार पडली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी टळली आहे. नेमकं काय घडलं - पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाला कठडेच नाही. त्यामुळे पुलावरून कार थेट पाण्यात कोसळली. मात्र, सुदैवाने नदीपात्रात पाणी थोडेच असल्याने कारमधील तीघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अरूंद असलेल्या या पुलाला गेल्या कित्येक वर्षांपासून कठडे नाही. कठडे नसल्याने हा अपघात झाला आहे. कावसान येथील उध्दव मापारी आपल्या पत्नीसह काम संपवून गावी जात असताना सुमारे 20 फूट खोल नदीत त्यांची कार कोसळली. सुदैवाने कारमधील तिघे सुखरूप बाहेर आले आहे. तसेच जीवितहानी टळली आहे. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळावरून कार क्रेनच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आली. या पुलाला कठडे बसवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. हेही वाचा -  औरंगाबाद : धडापासून शिर वेगळे केलेल्या त्या खुनाचा खुलासा, धक्कादायक कारण समोर समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी  समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. काल आणखी एक भीषण अपघात या महामार्गावर झाला. कार डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. धामणगाव रेल्वे तालुका परिसरात हा अपघात झाला. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही कार डिव्हायडरला धडकल्याचा  प्राथमीक अंदाज वर्तवण्यात  आला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारची मागची आणि पुढची बाजू पूर्णपणे डॅमेज झाली आहे. या कारची अवस्था पाहूनच या भीषण अपघाताची कल्पना येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या