JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एसटी बसने बैलगाडीला उडवलं; आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

एसटी बसने बैलगाडीला उडवलं; आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद - पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. बस आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागेवरच ठार झाले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 29 नोव्हेंबर :  औरंगाबाद - पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. बस आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागेवरच ठार झाले आहेत. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढोरेगावर परिसरात हा अपघात घडला. ही बैलगाडी ऊसतोड करणाऱ्या मजुराची होती. या घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडताना अपघात   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद - पुणे महामार्गावर ढोरेगाव परिसरात आज बैलगाडी आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ही बैलगाडी ऊसतोड मजुराची असल्याच माहिती समोर येत आहे. ही बैलगाडी ढोरेगावला ऊस तोडणी करण्यासाठी चालली होती. रस्ता क्रॉस करत असताना औरंगाबादकडे जाणाऱ्या बसने या बैलगाडीला उडवले.  चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या