JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad Crime : दिवाळीच्या पहाटेलाच औरंगाबाद हादरलं, सुरक्षा रक्षकाला ठार करत केली जबरी चोरी

Aurangabad Crime : दिवाळीच्या पहाटेलाच औरंगाबाद हादरलं, सुरक्षा रक्षकाला ठार करत केली जबरी चोरी

औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे (औरंगाबाद) 26 ऑक्टोबर : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्रायजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्रायजेसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवले यावेळी त्यांचा तिथेच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.26) पहाटेच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडाली. दिवाळी पाडव्याच्या पहाटे अशाप्रकारची घटना घडल्याने औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्रायजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्रायजेसमध्ये 70 वर्षीय पाशु नावाची व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. आज (दि.26) सकाळी 5 वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशातून 4 जणांनी पाशु यांना बांधून ठेवत चोरी केली. या दरम्यान पाशु यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.26) पहाटेच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडाली. दिवाळी पाडव्याच्या पहाटे अशाप्रकारची घटना घडल्याने औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

हे ही वाचा :  लक्ष्मीपूजनासाठीचं साहित्य, घराबाहेर दागिने, चिठ्ठी अन् मायलेकीचा पंख्याला लटकलेला मृतदेह; अमरावतीत खळबळ

संबंधित बातम्या

कार्टून्स जिवावर बेतले

औरंगाबाद शहरातील मौढा नाका येथे बालाजी एंटरप्रायजेस येथील शोरुममध्ये चोरी करण्यात आली. यावेळी तेथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चार चोरट्यांनी बांधून ठेवल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान चोरटे त्या शोरुममधील चोरी करत असताना त्या सुरक्षा रक्षकांने त्यास विरोध केल्याने त्याला बांधुन ठेवण्यात आलं होत. यावेळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी डीसीपी उज्वला वनकर आणि क्रांती चौक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

जाहिरात

औरंगाबादमध्ये फटाके फोडण्यावरून मारहाण

औरंगाबादमध्ये फटाके फोडण्यावरून मोठा वाद झाला आहे. या वादातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टोळक्याकडून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी आणि कंबरेच्या बेल्टने मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.

मारहाण झालेल्या तरुणाने पोलिसांमध्ये धाव घेतली. या टोळक्यापैकी एकही जण तरुणाच्या ओळखीचा नव्हता. दरम्यान मुकुंदवाडी पोलिसांनी टोळक्यातील सात जणांना ताब्यात घेतलं असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  हातपाय बांधून स्वतःलाच पोत्यात कोंबलं अन्.., महिलेनं रचला सामूहिक बलात्काराचा बनाव, थक्क करणारं कारण

फटाके फोडण्यावरून हा तरुण आणि टोळक्यात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. रात्री 11.30-12.00 च्या सुमारास हा राडा झाला. बेदम मारहाण झाल्यामुळे हा तरुण पोलीस स्टेशनला जायच्या स्थितीमध्ये नव्हता. यानंतर तरुणाने आज सकाळी पोलिसांना माहिती दिली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करत 7 जणांना अटक केली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या