मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. याआधीही नारायण राणेंनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी ते सुद्धा निवडून आले नव्हते.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 05 नोव्हेंबर : ‘हे सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहे. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे 16 आमदारांवर अपात्रेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच मुद्यावर चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. (‘कोण आला रे…’ सुषमा अंधारेंना अडवलं, आता मुक्ताईनगरमध्ये होणार उद्धव ठाकरेंची सभा!) ‘कोर्टाने निर्णय दिला तर शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले जातील. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्रिपद कायम राहावे यासाठी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. काँग्रेसची सध्या रॅली सुरू आहे. त्यामुळे सगळे शांत बसलेले आहे, असा दावाच चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. (राज्यात होणार आणखी एक युती? नाना पटोले यांचं सूचक विधान) तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. याआधीही नारायण राणेंनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी ते सुद्धा निवडून आले नव्हते. राणे निवडून येऊ शकले नाही तर हे कोण आहे. पैसा वैगेरे काहीही नाही, लोक मतदान बरोबर करतात. ठाण्यात त्यांची ताकद कितीही असेल तरीही आमचे खासदार त्यांच्याकडे गेले नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 40 आमदार तर पडणारच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण पडणार आहे, असं भाकितही चंद्रकांत खैरेंनी वर्तवलं.