JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डॉक्टर होण्याचं स्वप्न हवेत विरलं; औरंगाबादेत 12 वीच्या विद्यार्थिनीचा हृदयद्रावक शेवट, अभ्यास ठरलं मृत्यूचं कारण

डॉक्टर होण्याचं स्वप्न हवेत विरलं; औरंगाबादेत 12 वीच्या विद्यार्थिनीचा हृदयद्रावक शेवट, अभ्यास ठरलं मृत्यूचं कारण

Suicide in Aurangabad: औरंगाबाद शहरातील जवाहरलाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 18 वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरात हृदयद्रावक शेवट केला आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 05 फेब्रुवारी: औरंगाबाद (Aurangabad) शहरातील जवाहरलाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 18 वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या (12th class female student commits suicide) केली आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीनं अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मुलीनं नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याचं गूढ अद्याप उलगडलं नाही. पण अभ्यासाच्या तणावातून (Study pressure) तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी जवाहरलाल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. उषा कृष्णाचंद्र चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. मृत उषा ही देवनगरी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिला डॉक्टर बनायचं होतं. त्याअनुषंगाने ती अभ्यास करत होती. पण गुरुवारी 3 जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तिने अचानक घरातील पंख्याला साडीने गळफास घेत जीवन संपवलं आहे. हेही वाचा- अपमानाचा घेतला भयंकर बदला; भिवंडीत मजुरांनी वृद्ध कपलचा चिरला गळा, गूढ उलगडलं मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत उषाचे वडील कृष्णाचंद्र चौधरी हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर तिचा लहान भाऊ घराबाहेर खेळत होता. याचवेळी मृत उषाने आपल्या आईला काही पेपर घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आईही दुकानात गेली होती. दरम्यान घरी कोणी नसताना उषाने आपल्या राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने आई दुकानातून परत आली असता, घरातील चित्र पाहून तिचा थरकाप उडाला. हेही वाचा- Mumbai: प्रेयसीच्या मागण्या संपत नसल्यानं तिलाच संपवलं; फिरायला घेऊन गेला अन्.. तिने तातडीने आरडाओरडा करत आसपासच्या लोकांना मदतीला बोलावलं. शेजाऱ्यांनी तिला तातडीने खाली उतरवत एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला घाटी येथे हलवण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून उषाला मृत घोषित केलं आहे. डॉक्टर बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या मुलीनं असं अचानक आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या