Home /News /mumbai /

Heartbreaking news: अपमानाचा घेतला भयंकर बदला; भिवंडीत मजुरांनी वृद्ध दाम्पत्याचा चिरला गळा, थरारक घटनेचं गूढ उलगडलं

Heartbreaking news: अपमानाचा घेतला भयंकर बदला; भिवंडीत मजुरांनी वृद्ध दाम्पत्याचा चिरला गळा, थरारक घटनेचं गूढ उलगडलं

Murder in Bhiwandi: भिवंडी तालुक्यातील अकलोली भागात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या (Old couple brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. अज्ञात मारेकऱ्यांनी घरातून घुसून दोघांचा गळा चिरून हत्या (Slit throat) केली होती.

पुढे वाचा ...
    ठाणे, 05 फेब्रुवारी: भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील अकलोली भागात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या (Old couple brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. अज्ञात मारेकऱ्यांनी घरातून घुसून दोघांचा गळा चिरून हत्या (Slit throat) केली होती.  ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पण ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याचा उलगडा होत नव्हता. पण अखेर कसून तपास करत पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (3 accused arrested) केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जगन्नाथ पाटील (83) आणि सत्यभामा पाटील (80) असं हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. मृत दाम्पत्य अकलोली येथील पेंढरीपाडा गावातील रहिवासी होते. दोघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समशुला खान, मकसुद खान आणि रोहीत कनोजीया या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्याच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या नातेवाईकांची मत्सशेती आहे. संबंधित आरोपी या मत्सशेतीत मजूर म्हणून काम करत होते. हेही वाचा-माहीम बीचवर तरुणाची हत्या; हल्ल्यात जखमी झालेली GF निघाली मास्टरमाइंड, कारण समोर आरोपी समशुला याला व्यवस्थित काम करता येत नसल्याच्या कारणातून मृत जगन्नाथ पाटील हे त्याच्यावर नेहमी ओरडायचे. त्यामुळे आरोपीच्या मनात जगन्नाथ यांच्याविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता. यातूनच त्यानं मित्र मकसुद आणि रोहीत यांच्या मदतीनं जगन्नाथ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यानुसार आरोपीनं घटनेच्या दिवशी 21 जानेवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास पाणी पिण्याच्या बहाण्यानं दाम्पत्याच्या घरात शिरले. यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या जगन्नाथ याचं नाक आणि तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा-औरंगाबादेत दोन गट आपसात भिडले; वृद्धाला काठीने अमानुष मारहाण, भयावह घटनेचा VIDEO यावेळी 80 वर्षीय सत्यभामा पाटील आपल्या नवऱ्याच्या मदतीला धावल्या. पण आरोपींनी धारदार शस्त्राने गळा कापून दोघांची निर्घृण हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत दाम्पत्यानं घराचा दरवाजा उघडला, नसल्याने शेजारच्या लोकांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिलं. यावेळी दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ठाणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही या गुन्ह्याचा तपास सुरू होता. अखेर पोलिसांनी संशयित म्हणून अलीकडेच रोहित कनोजीया याला अटक केली होती. आरोपीची कसून चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली. तसेच कटात सहभागी असणाऱ्या अन्य आरोपींची नावं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आरोपी मकसुद आणि समशुला यांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accusation, Bhiwandi, Crime news, Murder, Old man, Old woman, Police arrest

    पुढील बातम्या