JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेले सपासप वार, महिलेने जागेवरच सोडला जीव

अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेले सपासप वार, महिलेने जागेवरच सोडला जीव

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सोनाळेमध्ये एका कुटुंबावर अचानक जीवघेणा हल्ला करण्यात आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पालघर, 13 मे: राज्यात लॉकडाऊन असूनही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सोनाळेमध्ये एका कुटुंबावर अचानक जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात महिलेचा मृत्यू झाला तर पती, सवत आणि लहान मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा..  मुंबई पोलिसांसाठी मध्यरात्री वाईट बातमी, आणखी एका पोलिसाची कोरोनाशी झुंज अपयशी याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (12 मे) ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात विलास वांगड (वय-45) याला वाचवण्यासाठी गेलेली पत्नी वैशाली विलास वांगड (वय-35) हिचा जागीच मृत्यू झाला. तर विलास वांगड त्याची दुसरी पत्नी वंदना विलास वांगड (वय-36), मुलगा समीर विलास वांगड (वय-18) हे तिघेही जण गंभीर जखमी आहेत. त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलास वांगड याची प्रकृती चिंताजनक असून त्याला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कासा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. हेही वाचा..  लेकीसाठी बापाने तयार केला गाडा, गर्भवती पत्नीसह 800 किमी चालत पोहोचले गावी दुसरीकडे, पालघर गडचिंचले 2 साधू 1 चालकाचा हत्या प्रकरणातील आरोपींना डहाणू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याआधी कोर्टाने सगळ्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. या हत्यामधील आरोपींवर जमावाने मारहाण करणे, हत्या करणे, तसेच पोलिसांवरही हल्ला करणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या