JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'त्यांच्याबद्दल बोलताना जरा औकातीत...'; त्या वक्तव्यामुळे अंबादास दानवेंवर भडकले आशिष शेलार

'त्यांच्याबद्दल बोलताना जरा औकातीत...'; त्या वक्तव्यामुळे अंबादास दानवेंवर भडकले आशिष शेलार

शेलार म्हणाले, की अमित शहा यांच्याविषयी बोलताना जरा औकातीत बोलावं. वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्पाबद्दल आधी माहिती घ्या आणि नंतर भाष्य करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 सप्टेंबर : अंबादास दानवे यांनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली होती. आदिलशहा, कुतुबशहाप्रमाणे अमित शाहांनाही परत पाठवू अशा शब्दात त्यांनी अमित शहांवर टीका केली होती. यावरुन आता आशिष शेलार यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांनी बोलताना भान बाळगावे, असा सल्ला आशिष शेलारांनी दिला आहे. CM Eknath Shinde : उद्योगासाठी ठाकरे सरकारने वाटप केलेल्या भुखंडाना मुख्यमंत्री शिंदेकडून स्थगिती, हजारो कोटींची गुंतवणूक ठप्प केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन दानवे यांनी अमित शाहांवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत शेलार म्हणाले, की अमित शहा यांच्या विषयी बोलताना जरा औकातीत बोलावं. वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्पाबद्दल आधी माहिती घ्या आणि नंतर भाष्य करा, असा सल्लाही त्यांनी दिला. आशिष शेलार म्हणाले, की वेदांता आणि फॅाक्सकॅान या प्रकल्पाची चर्चा ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली. मात्र प्रकल्प सुरू झाला नाही. ज्याप्रकारे मुंबई पालिकेत कट कमिशन सुरू केले आहे. त्याप्रमाणे वेदांतासाठी किती कमिशन मागितले होते. या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी. नवाब मलिक बाहेर, आव्हाडांचं प्रमोशन, शरद पवारांच्या ‘टीम राष्ट्रवादी’ची घोषणा! दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देत अंबादास दानवे म्हणाले, की आशिष शेलार आमच्यावर आरोप करीत आहेत, कारण त्यांच्या पोटात जे असतं तेच ओठावर असतं. गुजरातसोबत काय डील झाली? हा सवाल आम्ही करावा का? एवढा मोठा प्रोजेक्ट गेला तरी भाजप गंभीर नाही. त्यामुळे राज्य गर्तेत जाईल, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या