JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Arvind Sawant Shiv Sena : दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर अरविंद सावंतांची पहिलीच प्रतिक्रीया म्हणाले

Arvind Sawant Shiv Sena : दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर अरविंद सावंतांची पहिलीच प्रतिक्रीया म्हणाले

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या शिंदे गट आणि शिवसेनेत दसरा मेळावा घेण्यावरूनही जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. (Arvind Sawant Shiv Sena)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या शिंदे गट आणि शिवसेनेत दसरा मेळावा घेण्यावरूनही जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. (Arvind Sawant Shiv Sena) दरम्यान शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार यावरून शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर जर परवानगी मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर जागा मिळवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर, बीकेसी मैदानात शिंदे गटाने बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे. यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले कि आम्हाला बिकेसी मैदानावर नाही तर शिवतिर्थावर परवानगी नक्की मिळेल.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटाने सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने शिवतीर्थावर जागा मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर तयारी सुरू केली होती. बीकेसी मैदानावर परवानगी मिळवण्यासाठी शिंदे गटाने अर्ज केला होता. त्यासाठी एमएमआरडीएने शिंदे गटाला परवानगी दिली आहे.

हे ही वाचा :  शिवसेनेआधी शिंदे गटाने मारले ‘मैदान’, दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी

संबंधित बातम्या

शिवसेनेनं सुद्धा बीकेसी मैदानासाठी अर्ज केला होता. पण, आधीच शिंदे गटाने अर्ज केला होता, त्यामुळे शिंदे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जर शिवसेनेला परवानगी मिळाली तर यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावा पाहण्यास मिळणार आहे.

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले की, आमचा कोणताही गट नाही, आमची शिवसेना आहे. बीकेसी मैदानावर परवानगी मिळावी यासाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. आता मला अशी माहिती मिळाली आहे की, एमएमआरडीने शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला म्हणून त्यांना पहिल्यांदा परवानगी मिळाली, हा निकष महापालिकेनं लावला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  राज ठाकरे विदर्भात पोहोचले, विदर्भात भाजपला देईल का मनसे टक्कर?

यावर अरविंद सावंत म्हणाले कि, हाच निकष लावायचा असेल तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिवतीर्थावर आम्हालाच परवानगी दिली पाहिजे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अद्याप परवानगी दिली नसली तरी अजून नकारही देण्यात आला नाही. त्यामुळे आम्हाला तिथे परवानगी नाकारली तर पुढचा निर्णय घेऊ. पण शिवतीर्थावर आम्हाला परवानगी नक्की मिळेल, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या