JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आर्वी गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई, डॉक्टर कदम अखेर बडतर्फ; पालिकेला बजावली नोटीस!

आर्वी गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई, डॉक्टर कदम अखेर बडतर्फ; पालिकेला बजावली नोटीस!

अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता

जाहिरात

अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते, प्रतिनिधी आर्वी, 18 जानेवारी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणामुळे (illegal abortion case) अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी डॉ. नीरज कदम (Dr. Neeraj Kadam )  याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी पदावरुन तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. तर कदम रुग्णालयात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याप्रकरणी आर्वी नगरपालिकेने रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे. आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताच्या घटनेने सर्वांचीच झोप उडाली आहे. मागील पाच दिवसांपासून पोलीस विभाग दिवसरात्र पुरावे गोळा करण्याचे काम करीत असतानाच आरोग्य विभागाने कदम रुग्णालयातील चारही डॉक्टरांविरुद्ध  सोमवारी रात्री तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी पुन्हा विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केला. अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून  कार्यरत होता. त्याला 50 हजार रुपये मानधनतत्वावर मिळत होते. मात्र, शासकीय औषधसाठा त्याच्या खासगी रुग्णालयात आढळून आल्याचा अहवाल टास्कफोर्स चमूने सादर केल्याने तसंच डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश  जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिले आहे. ( ताजमहालापेक्षा 5 पट मोठा लघुग्रह येतोय पृथ्वीच्या दिशेनं, उरले अवघे काही तास…! ) दुसरीकडे या प्रकरणात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याची आर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी नागपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी कदम रुग्णालयाच्या संचालकाला नोटीस देत तात्काळ खुलासा मागविला आहे. पालिकेच्या पत्रात त्यांनी कदम नर्सिंग होम येथे निर्माण होत असलेला जैव वैद्यकीय कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याकरीता अधिकृत एजन्सीकडे सोपविणे गरजेचे आहे. परंतु आपण आपल्या नर्सिंग होम मधून निघणारा जैव वैद्यकीय कचरा अधिकृत एजन्सीला सोपवित नसल्याचे, तसंच त्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावत नसल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, संदर्भीय नियमानुसार, आपणावर कार्यवाही का करण्यात येवू नये, याचा खुलासा तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे सांगितलं आहे. आरोग्य विभागाचा अभ्यास गट आर्वीत दाखल दरम्यान, आर्वीच्या कदम रुग्णालयात झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणात सोमवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ अर्चना पाटील यांनी सहा सदस्य असलेल्या अभ्यासगटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटाला दहा दिवसात प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. या अनुषंगाने आज हा अभ्यासगट आर्वीत संध्याकाळी पाच वाजता दाखल झाला. सुरवातीला या अभ्यासगटाच्या सदस्यांनी कदम रुग्णालयात तब्बल दीड तास पाहणी केली. ( बिग बॉस मराठी फेम आदिश वैद्यला गर्लफ्रेंडने काढलं घराबाहेर ? का ते पाहा…. ) दरम्यान, त्यांनी रुग्णालयातील गॅस चेंबरसह सोनग्राफी मशीन आणि इतर भागाची पाहणी केलीय. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यानंतर  सदस्यांनी पोलीस स्टेशनं गाठत पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करत प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या अभ्यासगटात नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सहाय्यक संचालक डॉ. दिगंबर कानगुले, राज्य पीसीपीएनडीटीच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे, यु. एन. एफ. पी. ए.च्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती अनुजा गुलाटी,यु. एन. एफ. पी. ए. सल्लागार डॉ. आसाराम खाडे, यु. एन. एफ. पी. ए. च्या सल्लागार ऍड . वर्षा देशपांडे यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या