JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंना कोकणातून पुन्हा धक्का, भास्कर जाधवांचं प्रमोशन होताच शिंदेंकडे इनकमिंग

उद्धव ठाकरेंना कोकणातून पुन्हा धक्का, भास्कर जाधवांचं प्रमोशन होताच शिंदेंकडे इनकमिंग

कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav Shivsena) यांना शिवसेना ठाकरे गटाने नेते पद दिल्यावर त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.

जाहिरात

Eknath Shinde Shivsena

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 सप्टेंबर : कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav Shivsena) यांना शिवसेना ठाकरे गटाने नेते पद दिल्यावर त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांना शिंदे गटात उपनेते पद मिळणार असल्याची माहीती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना भरघोस विकास निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात गेल्यामुळे त्याचे पडसाद आता गुहागर तालुक्यातही बसणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. भास्कर जाधव यांची मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना नेतेपदी वर्णी लागली. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांचं प्रमोशन केलं. ‘भास्कररावांना विचार करून नेतेपदाची जबाबदारी दिली आणि आता लढण्याची वेळ आहे. भास्करराव काय करू शकतात हे 12 आमदारांना विचारा,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. भास्कर जाधव तालिका अध्यक्ष असताना त्यांनी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं. ठाकरेंकडे कोकणात 3 आमदार एकनाथ शिंदेंच्या बंडाचा उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा फटका कोकण आणि मराठवाड्यात बसला. कोकणात आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 3 आमदार शिल्लक आहेत, यात गुहागरचे भास्कर जाधव, राजापूरचे राजन साळवी आणि कुडाळचे वैभव नाईक यांचा समावेश आहे. यातल्या राजन साळवी यांच्यावर शिवसेना नेतृत्व नाराज आहे. राजन साळवी यांनी राजापूर रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावलं आणि खडसावल्याचीही माहिती आहे. पक्षश्रेष्ठींनी रिफायनरीला विरोध केल्यास आमदार राजन साळवी वेगळी राजकीय भूमिका घेण्याची शक्यता आहे. राजन साळवींचं रिफायनरीला समर्थन हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याची शिवसेना नेत्यांची भूमिका आहे, पण भास्कर जाधवांना (Bhaskar Jadhav) शिवसेना नेतेपद दिल्यामुळे राजन साळवी नाराज तर नाहीत ना? अशी चर्चाही सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या