JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची 20 मिनिटं चौकशीनंतर CBI कडून सुटका

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची 20 मिनिटं चौकशीनंतर CBI कडून सुटका

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता.

जाहिरात

अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वेदी ( Gaurav Chaturvedi) यांना सीबीआयनं (CBI) ताब्यात घेतलं होतं. 20 मिनिटांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र देशमुख यांच्या लीगल टीममधील वकील आनंद डागा यांना सीबीआयनं अटक केली आहे. अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. त्यासंदर्भात ही कारवाई सुरु असल्याचं बोललं जात आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना बुधवारी मुंबईतील वरळी येथून सीबीआयने ताब्यात घेतल्या नंतर एकच खळबळ उडाली. सीबीआयकडून त्यांना कोणत्याही प्रकारचं समन्स सुनावण्यात आलं नव्हतं. वरळीतील सुखदा इमारतीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा आपल्या गाडीने जात होते, यावेळी सीबीआयने गाडी रोखून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे. देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे ” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी सीबीआयच्या कारवाईवर टीका केली.

संबंधित बातम्या

देशमुख कुटुंबियांकडून अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. गौरव चतुर्वेदी यांचं वरळीतील निवासस्थानाखाली10 जणांनी अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला. याप्रकरणी देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली होती. सप्टेंबरमध्ये निर्बंध कडक लागू होणार?, अस्लम शेख यांचं महत्त्वाचं विधान देशमुख चौकशी अहवालप्रकरणी एकाला अटक सीबीआयचे सब इंस्पेकटर अभिषेक तिवारीला स्वत: सीबीआयने अटक केली. अनिल देशमुख यांच्या प्रकरणा संदर्भात सीबीआयचा अंतर्गत चौकशी अहवाल फुटला होता. त्या प्रकरणात सीबीआयने उशिरा रात्री ही अटक केली. सोबतच अभिषेक तिवारी यांचे सीबीआय कार्यालयातील लॉकर आणि अलाहाबाद येथील लॉकरची देखील सीबीआयने तपासणी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले… अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा सीबीआयचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे कागदपत्र बाहेर कशी आली याचा सीबीआय मागच्या सहा दिवसापासून तपास करत होते. त्यांनतर ही कारवाई करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या