JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आम्ही पण बघून घेऊ, अनिल देशमुख प्रकरणावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

आम्ही पण बघून घेऊ, अनिल देशमुख प्रकरणावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

Sanjay Raut Reaction: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात ईडीनं (ED) केलेल्या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) प्रकरणात ईडीनं (ED) केलेल्या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Shivsena Mp Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुद्द्यावर बोलताना संजय राऊत भाजपवर चांगलेच भडकलेत. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे साऱ्यांना माहिती आहे. राज्यातील नेते, मंत्र्यांवर काही आरोप असतील तर राज्यातील तपास यंत्रणा चौकशी करण्यास सक्षम आहे हे आम्ही वारंवार सांगत आलोय. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम ठरवून त्रास दिला जात आहे. आम्ही पण बघून घेऊ, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला. हेही वाचा-  ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का अनिल देशमुखांच्या घरावर आणि कार्यालयावर ज्या छाडी पडल्या, त्याचे कारण भाजपची निराशा आहे. भाजपला सरकार बनवता आलेले नाही, त्यामुळे ते निराश झालेत. हे सर्व निराशेतून केले जात आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही त्रास दिला जात असल्याचं संजय राऊत म्हणालेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स (Summons)बजावलं आहे. देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीला भाग पाडल्याचे आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते. या आरोपांवरून शुक्रवारी ईडीने त्यांच्या विविध मालमत्तांवर छापेमारी (Raid) केली. मुंबईतील (Mumbai) तीन आणि नागपूरमधील (Nagpur) दोन अशा एकूण पाच ठिकाणी ईडीने छापा टाकले. तसंच देशमुखांचे दोन्ही स्वीय्य सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना काल ईडीने चौकशी केल्यानंतर अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या