JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''अनिल देशमुखांचे PA चौकशीला सहकार्य करत नाही, सचिन वाझेला ओळखत नाही म्हणतात'', ईडीची माहिती

''अनिल देशमुखांचे PA चौकशीला सहकार्य करत नाही, सचिन वाझेला ओळखत नाही म्हणतात'', ईडीची माहिती

Anil Deshmukh Case: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home minister Anil Deshmukh) यांचे दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जुलै: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home minister Anil Deshmukh) यांचे दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या (Kundan Shinde and Sanjeev Palande)दोन्ही आरोपींच्या ईडी कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे. दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. पाच दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी ईडीनं पुन्हा एकदा मोठे खुलासे केले. सुरुवातीला ईडीनं न्यायालयाकडे दोघांचीही सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र आता आरोपींच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मिडीलमॅन असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. तसंच 4 कोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते, असंही ईडीनं सांगितलं आहे. आरोपी चौकशीला सहकार्य करत नसून सचिन वाझेला ओळखत नसल्याच आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी सचिन वाझेला ओळखत नाही सांगतात, असं ईडीनं म्हटलं आहे. हेही वाचा-  मोठी बातमी: विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये हालचाली, ‘या’ नावांची जोरदार चर्चा दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्या बदल्या करण्यात येत होत्या. ती लिस्ट तपासायची आहे. बदली झालेल्या IPS पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करायची असल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलं आहे. दोन्ही आरोपींचे आयकर डिटेल्ट तपासायचे असून मिळालेल्या कॅशचं काय झालं?, हे पैसे कुठे गेले याची चौकशी करायची असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही इतर मंत्र्यांची नावं आली आहेत. त्यामुळे त्या यादीची तपासणी करायचं असल्याचंही ईडीनं म्हटलं आहे. हेही वाचा-  गुलशन कुमार हत्या प्रकरण: 24 वर्षानंतर High Court चा मोठा निर्णय मधल्या काळात 10 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आणि त्या परत रद्द केल्या गेल्या त्या का आणि कशाकरिता केल्या गेल्या याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा खुलासा ईडीचे वकील सुनिल गोंसवलीस यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या