JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : ऋतुजा लटकेंना उमेदवारी, 'महाविकासआघाडी'चं शक्तीप्रदर्शन, 7 नेते मैदानात!

Andheri East Bypoll : ऋतुजा लटकेंना उमेदवारी, 'महाविकासआघाडी'चं शक्तीप्रदर्शन, 7 नेते मैदानात!

ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकासआघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकासआघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे. ऋतुजा लटके या शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता गुंदवली मनपा शाळा येथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गणेश मंदिर, मालपा डोंगरी इथून 9.30 वाजता फेरीला सुरूवात होणार आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. हे नेते उपस्थित राहणार 1 आदित्य ठाकरे 2 सुभाष देसाई 3 दिलीप वळसे-पाटील 4 भाई जगताप 5 सुरेश शेट्टी 6 अनिल परब 7 अनिल देसाई लटकेंना दिलासा दरम्यान ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यामुळे त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. निवडणूक लढवायची असल्यास कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा द्यावा लागतो, त्यानंतर लटके यांनी राजीनामा दिला, पण हा राजीनामा स्वीकारला जात नसल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले. मुरजी पटेलना उमेदवारी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजपचे मुरजी पटेल मैदानात उतरणार आहेत. शेवटचा दिवस असल्यामुळे मुरजी पटेल यांनाही शुक्रवारीच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. 3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. 6 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या