JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : अंधेरीचा ग्राऊंड रिपोर्ट! मराठी, गुजराती, उत्तर भारतीय... कुठला मतदार ठरणार जाएंट किलर!

Andheri East Bypoll : अंधेरीचा ग्राऊंड रिपोर्ट! मराठी, गुजराती, उत्तर भारतीय... कुठला मतदार ठरणार जाएंट किलर!

andheri east bypoll election अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात होणारा सामना उत्कंठावर्धक झाला आहे. अंधेरी पूर्वच्या या मतदारसंघात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके हे 2014 पासून अंधेरी पूर्वचे आमदार होते. त्याआधी 1970 पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण 2014 ला परिस्थिती बदलली. भाजप-शिवसेनेने वेगळी निवडणूक लढूनही रमेश लटके निवडून आले. अंधेरीच्या लढाईत ठाकरेंची नवी खेळी, ऋतुजा लटकेंचंही टेन्शन वाढलं! अंधेरी पूर्वचं समीकरण अंधेरी पूर्वचा हा मतदारसंघ कॉस्मोपोलिटियन म्हणून ओळखला जातो. या मतदाससंघामध्ये जवळपास 2 लाख 80 हजार मतदार असून 70 हजारांच्या आसपास मराठी मतं, 35 हजार नवबौद्ध मतदार आहेत. मराठी मतांपाठोपाठ या भागात उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचं प्राबल्य आहे. अंधेरी पूर्वमध्ये 55 हजार उत्तर भारतीय आणि 37 हजारांच्या जवळपास गुजराती मतदारांची संख्या आहे. मुस्लीम मतदार 70 हजार आणि 8 ते 10 हजार ख्रिश्चन मतदार आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत ‘मशाल’ सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात! अंधेरी पूर्व मतदारसंघात मुंबई महापालिकेचे एकूण 4 वॉर्ड आहेत, यातल्या 4 वॉर्डांमध्ये शिवसेनेचे, 2 जागांवर भाजप आणि 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक होते. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, तर भाजपचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यासह लढत आहे. अंधेरी पूर्वचं हे समीकरण बघितलं तर मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदाराचा कल कोणत्या बाजूला जातो, यावर निकालाचं चित्र अवलंबून असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या