President Donald Trump pauses during his meeting to discuss potential damage from Hurricane Michael, in the Oval Office of the White House in Washington, Wednesday, Oct. 10, 2018. (AP Photo/Pablo Martinez Monsivais)
पुणे, 23 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्पसह 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. अहमदाबादसह ज्या ज्या ठिकाणी ते भेट देणार आहेत, त्याठिकाणची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी ट्रम्प यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासंदर्भातील काही ट्वीट्स देखील त्यांनी केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प कुठे थांबणार, कोणकोणत्या ठिकाणांना भेट देणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांचं पुणे कनेक्शन सुद्धा आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. पुण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाची पाळमुळं आहेत. डोनाल्ड ट्रम्प जरी राजकारणी असले तरी त्यांच्याकडे मुरलेला व्यावसायिक म्हणून पाहिलं जातं. त्यांचा व्यवसाय पुण्यासह मुंबई, गुरूग्राम आणि कोलकातामध्ये पसरलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प जरी भारतात पहिल्यांदा येत असले, तरी त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर कामानिमित्त भारतात येऊन गेला आहे. 2018 मध्ये पुण्यातील ट्रम्प टॉवरचं उद्घाटन डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरच्या हस्ते झालं होतं. (हेही वाचा-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी माकडं तैनात) भारतातील रिअल इस्टेट व्यवसायात ट्रम्प यांनी आपल्या कंपनीचा विस्तार केला आहे. पुण्यासह मुंबई, गुरूग्राम आणि कोलकातामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ तुम्हाला पाहायला मिळतील. 
2018 मध्ये पुण्यातील ट्रम्प टॉवरचं उद्घाटन डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या हस्ते झालं होतं.
रिअल इस्टेट व्यवसायात उत्तर अमेरिकेनंतर ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’चा सर्वाधिक व्यवसाय भारतामध्ये आहे. भारतामध्ये ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ने 2013 मध्ये प्रवेश केला होता. गेल्या 7 वर्षात या व्यवसायाच्या शाखा भारतातील अनेक शहरांमध्ये पसरल्या आहेत. ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ने भारतातील अनेक कंपन्यांबरोबर मिळून 5 लग्झरी रेसिडेंशिअल प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत. पुणे-मुंबईमधील ‘ट्रम्प टॉवर’ पंचशील रिअल्टीच्या सहयोगाने पुण्यामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभारण्यात येत आहे. ‘ट्रम्प टॉवर’ नावाने पुण्यामध्ये 23 मजली 2 इमारती उभारण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार याच टॉवरमध्ये अभिनेता ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांचे फ्लॅट असणार आहेत. याठिकाणी एका फ्लॅटची किंमत 15 करोडहून जास्त असणार आहे. तर मुंबईतील वरळीमध्ये ट्रम्प टॉवर आहे. 700 एअरमध्ये पसरलेल्या या टॉवरमधील फ्लॅट्सची किंमतही करोडोंच्या घरात आहे. 78 मजली ही इमारत लोढा गृपच्या मदतीने उभारण्यात आली आहे. याठिकाणी 9 करोडपासून फ्लॅटची किंमत आहे.