JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा, वाहनचालकांचाही जीव धोक्यात!

Video : बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा, वाहनचालकांचाही जीव धोक्यात!

शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 16 सप्टेंबर : शहरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रिक्षाचालक रस्त्यांत अचानक थांबून प्रवाशांची चढउतार करत आहेत. शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत. मागील तीन वर्षापासून बस सेवाही बंद असल्याने रिक्षाचालक अधिक दराने भाडे आकारणी करीत आहेत.   अकोला शहरात रिक्षाचालकांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरातील चौकाचौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे इतर वाहनचालकांना वाहतुकीस त्रास होत आहे. रहदारी असलेल्या चौकाचौकात रिक्षाचालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यांमध्येच प्रवाशांची चढउतार होत आहे. याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना सोसावा लागत आहे. शहरात 18 ते 20 हजार ऑटोरिक्षा अकोला शहरात 18 ते 20 हजार ऑटोरिक्षा आहेत. महानगरपालिकेने 20 ठिकाणी ऑटो स्थानकांची व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र, या स्थानकावर ऑटोरिक्षा दिसतच नाहीत. रस्त्यावर कुठेही जागा दिसेल त्या ठिकाणी रिक्षा उभी केली जाते. रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या मध्येच, प्रवासी जिथे हात दाखवेल तिथेच ऑटोरिक्षा थांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली  रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. हे नियम जसे रिक्षा सोडून इतर वाहनांसाठीच आहेत. असा अविर्भाव रिक्षाचालकांचा असतो. अशा ऑटोरिक्षावर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते मात्र, तरीही कारवाईला न गुमानता नियम पायदळी तुडवले जात असल्याचे म्हणणे नागरिकांची आहे.   हेही वाचा-   पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO

 बससेवा पुन्हा सुरू करा

महानगरपालिकेने शहरात सिटी बस सुरू केली होती. मात्र सिटीबस गेल्या तीन ते चार वर्षापासून बंद आहे. याचा गैरफायदा रिक्षाचालक घेत आहेत. त्यामुळे बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.     बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई शहरातील रिक्षा स्थानकांच्या तुलनेत रिक्षांची संख्या अधिक आहे. रिक्षाचालक अनेक वेळा नियमांचे उल्लंघन करतात. वाहतूक पोलीस अशा रिक्षाचालकांवर वेळोवेळी कारवाई करते, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या