अहमदनगर, 19 डिसेंबर : अहमदनगर मधील खवय्यांना हलकाफुलका असा वाटणारा आणि चवीलाही तितकाच स्वादिष्ट वाटणारा पापड भाजी पदार्थ खूप आवडतो. या पापड भाजीने नगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मूळ राजस्थानी बनावटीचा हा पदार्थ नगरमध्ये कसा आला आणि नक्की हा पदार्थ आहे तरी काय पाहुयात. पापड भाजी म्हटलं की नेमकं काय असेल असे अनेकांना वाटतं असते. आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पापड खातो. मात्र, पापड भाजी हे काही तरी नवीनच. नगरच्या कापड बाजार पेठेत हा पापड भाजी पदार्थ मिळतो. नगरकर मोठ्या आवडीने या पदार्थावर ताव मारतात. पापडासोबत भाजी हे कॉम्बिनेशन थोडं वेगळं वाटतं असलं तरी याची चव भारीच आहे. ही पापड भाजी एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवली जाते. समोसाच्या उरलेल्या पिठाच्या बारीक काप कस्टमरने मागितले त्यासोबत भाजी खाण्यासाठी दिली. कस्टमरला हा भन्नाट प्रयोग खूपच आवडता. त्यातूनच पापड भाजी या पदार्थाची सुरुवात झाली. राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, इथं चेक करा तुमच्या शहरातील तापमान अशी बनते पापड भाजी अनेकांना पापड भाजीच कॉम्बिनेशन खूप आवडले. यात मैदा, रवा, तेल, ओवा, जिरा अशा पदार्थांचे मिश्रण करून त्यापासून पापड लाटला जातो. हा पापड तळल्यानंतर त्याला चांगला कडकपणा येतो. त्यानंतर त्यावर बटाटा, वाटाणा, मूगडाळ, हरभरा डाळ, पालक, कोथिंबीर, टोमॅटो आदींपासून तयार केलेली भाजी टाकण्यात येते. त्यावर चिंचेचे पाणी, कांदा व मिरची टाकली जाते. हातात कडक पापड व त्यावर गरमागरम भाजी आल्यावर पापडाचा तुकडा तोडून तो भाजीत बुडवून खाताना नेहमीचा पापड खातानाचा कुरमकुरम आवाज व समवेत आंबट-तिखट भाजीची लज्जतदार चव जिभेला तृप्तीची अनुभूती देते. ‘इथं’ मिळते बांबूमध्ये बनवलेली शाकाहारी बिर्याणी, पाहा काय आहे खासियत video 1970 मध्ये सुरूवात 1970 च्या दरम्यान नगरमध्ये पापड भाजी मिळण्यास सुरुवात झाली. त्या काळी या पापड भाजीची किंमत 15 पैसे होती,’ असे पापड भाजी विक्रीचा तीन पिढ्यांपासून व्यवसाय करणाऱ्या खंडेलवाल परिवारातील आनंद खंडेलवाल सांगतात. ‘नगरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी आल्यानंतर नागरिक आवर्जून पापड भाजी खाण्यास येतात. आता तर नगर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा राज्याच्या विविध भागातील नागरिक आमच्याकडे पापड भाजी खाण्यास येत असतात. सुरुवातीला 15 पैशांना मिळणारी पापड भाजी आता 35 रुपयांना मिळते.