JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सासरच्यांनी जिवंतपणीच विवाहितेला दिल्या नरक यातना, आधी तोंडात फिनाइल ओतलं मग...

सासरच्यांनी जिवंतपणीच विवाहितेला दिल्या नरक यातना, आधी तोंडात फिनाइल ओतलं मग...

Crime in Ahmednagar: अहमदनगर शहरात कौटुंबीक हिंसाचाराची अमानुष घटना उघडकीस आली आहे. येथील एका विवाहित महिलेसोबत तिच्या पतीसह सासरच्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे.

जाहिरात

(प्रातिनिधीक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 01 जानेवारी: अहमदनगर शहरात कौटुंबीक हिंसाचाराची (Domestic violence) अमानुष घटना उघडकीस आली आहे. येथील एका विवाहित महिलेसोबत तिच्या पतीसह सासरच्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपींनी पीडित महिलेच्या तोंडात फिनाइल ओतून (pour phenyl into victims mouth) तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to murder) केला आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेनं कोतवाली पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा तपास केला जात आहे. पती दिनेश गौतम मेढे, सासू अनिता आणि सासरा गौतम मेढे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी 25 वर्षीय विवाहित स्नेहा दिनेश मेढे यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित संतापजनक घटना शहरातील स्टेशन रोड परिसरातील जय भीम हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा- संतापजनक! विवाहित पोलिसाचा तरुणीवर 4 वर्षे रेप, गरोदर राहताच केलं अघोरी कृत्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपडे धुण्याच्या कारणातून वादाला सुरुवात झाली होती. यावेळी संतापलेल्या पतीने पीडित महिलेला जबरी मारहाण करत तिला जमिनीवर पाडलं. यावेळी आरोपी सासू आणि सासऱ्यांनी पीडितेची पाय पकडून ठेवले. दरम्यान पतीने पीडितेच्या तोंडात फिनाइल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या मारहाणीत पीडित महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा- संमतीने विवाह ठरल्यानंतरही नवरदेवाला झाली भलतीच घाई, लग्नाआधीच तरुणीवर केला रेप या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत, पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. यावेळी पीडितेनं “सासरच्या लोकांकडून आपणास वारंवार शिवीगाळ आणि मारहाण होत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या