Home /News /national /

संमतीने विवाह ठरल्यानंतरही नवरदेवाला झाली भलतीच घाई, लग्नाआधीच तरुणीवर केला बलात्कार

संमतीने विवाह ठरल्यानंतरही नवरदेवाला झाली भलतीच घाई, लग्नाआधीच तरुणीवर केला बलात्कार

Crime News: दोघांच्या कुटुंबीयांनी संमतीनं विवाह ठरल्यानंतरही तरुणानं आपल्या होणाऱ्या बायकोवर बलात्कार (young man raped fiancee) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    रायपूर, 01 जानेवारी: दोघांच्या कुटुंबीयांनी संमतीनं विवाह ठरल्यानंतरही तरुणानं आपल्या होणाऱ्या बायकोवर बलात्कार (young man raped fiancee) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर, त्याने पीडितेशी विवाह करण्यास नकार दिला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरुणीनं थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल (FIR lodged) होताच अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हिमांशू विश्वकर्मा असं अटक केलेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो छत्तीसगड येथील भिलाई-दुर्ग येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी देखील  छत्तीसगडची रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 4-5 वर्षांपूर्वी चंपा येथे आपल्या एका नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेली होती. या लग्नात आरोपी देखील आला होता. याचवेळी त्यानं पीडितेला आपल्या जाळ्यात ओढलं आणि लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकार दर्शवला. हेही वाचा-संतापजनक! विवाहित पोलिसाचा तरुणीवर 4 वर्षे रेप, गरोदर राहताच केलं अघोरी कृत्य दरम्यान, आरोपी तरुण 2019 साली फिरण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीच्या घरी आला होता. यावेळी त्यानं आपण लवकरच लग्न करू असं सांगत पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर 9 महिन्यांनंतर तो पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी मुलीच्या आईला भेटल्यानंतर त्यानं तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी न जुळवण्याची गळ घातली. त्यानंतर त्यानं पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. असं करत दोन वर्षे उलटून गेली तरी तो लग्नाचं नाव काढत नव्हता. हेही वाचा-हृदयद्रावक! एक महिन्यातच मोडला संसार, नागपुरात नवविवाहित कपलचा तडफडून मृत्यू त्यामुळे मुलीनं लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यानंतर त्यानं पीडितेला स्पष्ट शब्दांत लग्नासाठी नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीला दुर्ग जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chhattisgarh, Crime news, Rape

    पुढील बातम्या