अहमदनगर, 24 सप्टेंबर : चाऱ्यामधून विषबाधा झाल्याने 11 गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जनावरे अत्यव्यस्थ झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यात लहान-मोठी 29 जनावरे आहेत. विषबाधेमुळे दोन दिवसातच त्यांच्याकडील तब्बल 11 गाया दगावल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गाईंच्या शरीरात ऑक्सलेट हे विषारी द्रव्य आढळून आल्याने विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून माहिती समोर आली आहे. चारा म्हणून दिलेल्या उसात नायट्रेटचे प्रमाण आढळून आल्याने नाइट्रिक पॉयझनिंग झाल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. गोठ्यातील जनावरे देखील अत्यवस्थ असल्याने पशुवैद्यकीय डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टर इतर गायांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हे ही वाचा : मुले चोरणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण; नाशिकमधील घटनेचा VIDEO आला समोर
दरम्यान एकाच गोट्यातील 11 जनावरे दगावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावर संबंधित डॉक्टर म्हणाले कि, जनावरांसाठी चारा म्हणून बाजारातून ऊस खरेदी करताना शहानिशा करणे गरजेचे आहे. कारण उसावर विविध विषारी द्रव्य फवारलेली असू शकतात. परिणामतः जनावरांना विषबाधा होण्याचा धोका निर्माण होतो. एकीकडे लम्पिचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे विषबाधेमुळे रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यात गाईंच्या मृत्यूचे तांडव बघायला मिळत असल्याने गोपालक शेतकरी धास्तावले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील लम्पीबाबत सतर्क
कोरोनानंतर राज्यासमोर आता लंपी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटला आहे. याची दखल घेत चुकीच्या बातम्या देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
लंपी आजारामुळे शेकडो जनावरं बाधीत झाले आहे. लंपी आजाराला आळा घालण्याठी लसीकरणाची मोहिम सुरू आहे. मात्र, गायीच्या दुधाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल चिंता व्यक्त करत कडक इशारा दिला आहे.
हे ही वाचा : वृद्धाचा विश्वास संपादन करून 86 लाखांना लुटले, खेडमधील घटनेने खळबळ
‘राज्यामध्ये दुधाचे उत्पादन जास्त होतंय ते कुठे कमी झालेल नाही विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे सामान्य नागरिकांना घाबरून जाऊ नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक बातम्या किंवा सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर अशा बातम्या देत देणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आदेश राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले आहे.