मुंबई, 23 जानेवारी: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray Birth Anniversary)आज 96 वी जयंती आहे. या निमित्तानं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडिया ट्विटरवर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरवर एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरे यांच्या हातात क्रिकेटची बॅट दिसत आहे आणि त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. या फोटोत बाळासाहेबांनी आदित्य ठाकरेंना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आदित्य ठाकरे यांनी केवळ नमस्कार या स्माईलीचा वापर केला आहे.
उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज शिवसैनिकांसोबत संवाद (Uddhav Thackeray will interact with Shivsainik) साधणार आहेत. आज ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. आज 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांना काय आदेश देणार? येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील. काय म्हणाले संजय राऊत अखंड महाराष्ट्र स्वाभिमानी, शक्तीमान, अस्मिता हे बाळासाहेबांचं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे हाच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राबाहेर आम्ही अभिमानांनी सांगतो की आम्ही मराठी आहोत याचा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला, असंही संजय राऊत यांनी म्हणाले. 24 तासात पाच वेळा हादरलं सातारा, एकाच दिवशी 5 जणांची आत्महत्या देशात सांगतो, आम्ही हिंदू आहेत. हिंदुत्वाची अस्मिता देखील बाळासाहेबांनी दिली. तसंच बाळासाहेबांनी जगाला देशाची हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिल्याचंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आजही अमर आहेत, ते आमच्यासोबत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘‘शिवसेनेच्या राजकारणाची पुढची भूमिका मांडतील’’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राज्याचे प्रमुख म्हणून जनतेशी संवाद साधतील. त्यात शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा देखील देतील आणि भूमिका मांडतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम असून विरोधकांना त्यांच्या तब्येतीची अधिक चिंता वाटते. त्याविषयी ते नेहमी बोलत असतात, विरोधी नेत्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची लक्षणं आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला आहे.