Home /News /maharashtra /

सातारा हादरलं..! 24 तासात पाच जणांची आत्महत्या, गळफास घेऊनं संपवलं आयुष्य

सातारा हादरलं..! 24 तासात पाच जणांची आत्महत्या, गळफास घेऊनं संपवलं आयुष्य

सातारा जिल्हा (Satara District) एका दिवसात पाच वेळा हादरला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तब्बल पाच जणांनी आत्महत्या (Committed Suicide) केली आहे.

    सातारा, 23 जानेवारी: सातारा जिल्हा (Satara District) एका दिवसात पाच वेळा हादरला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तब्बल पाच जणांनी आत्महत्या (Committed Suicide) केली आहे. जिल्ह्यातल्या विविध भागातल्या पाच जणांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. 24 तासात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सातारा जिल्हा पुरताच हादरला आहे. कौटुंबिग आणि आजारपणाला कंटाळून या पाचही जणांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षांच्या खालील आहेत. आत्महत्या केलेल्यांची नावं गणपत कणसे - वय 35- विहे, पाटण सुमित गायकवाड- वय 28- वडगाव हवेली, कराड अमोल पाटील- वय 37, सुपने, कराड अक्षय इंगवले- वय 27, किडगाव, सातारा पोपट ढेडे- वय 40. वाई, भुईंज वाई तालुक्यातील भुईज येथील पोपट जनार्दन ढेडे यांनी वाईतल्या एमएसईबीच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये साडीनं आत्महत्या केली. सुमित सुरेश गायकवाड या तरुणानं घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीय. Budget 2022: निर्मला सीतारामन यांच्या या उपाययोजना सामान्यांना देणार मोठा दिलासा अमोल निवासराव पाटील यानं एका जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेतला. गणपत कणसे यांनी आजारपणाला कंटाळून घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. अक्षय हिंदूराव इंगवले यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Satara (City/Town/Village), Sucide

    पुढील बातम्या