JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ..तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते; नितेश राणेंचा पवारांना टोला

..तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते; नितेश राणेंचा पवारांना टोला

रोहीत पवार सगळीकडे तोंड मारत फिरू नका 2024 ला तुमचे निवडुन यायचे वांदे; नितेश राणेंचा रोहीत पवारांना टोला.

जाहिरात

..तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 13 डिसेंबर : शक्ती कायदा अमलात आला असता तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी यांनी दिली. राष्ट्रावादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी शक्ती कायदा कधी अस्तित्वात येणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देत असताना राणे यांनी रोहीत पवार यांच्यावर टीका केली. राणे आज साताऱ्यात आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपले 2024 निवडणू येण्याचे वांदे : नितेश राणे लव जिहाद तसेच धर्मांतर कायद्यावर सगळेच बोलतायेत. मात्र, शक्ती कायद्यावर कोणीच बोलत नसल्याचा आरोप रोहीत पवार यांनी कोल्हापूरमध्ये केला होता. यावर नितेश राणे यांनी जोरदार टिका करत हा कायदा त्यांच्या सरकारवेळीच आणला असता तर त्यांच्या सरकारमधले दोन ते तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अगदी आदित्य ठाकरे देखील आत गेले असते अशी टिका नितेश राणे यांनी केली. पुढे राणे म्हणाले, की रोहीत पवारांनी या कायद्याविषयी आधी समजुन घ्यावं. अमेझॉनच्या अलेक्सासारखं त्यांनी बोलू नये.

संबंधित बातम्या

यानंतर महाविकासआघाडीचे दोन मंत्री आधी आत टाकू : राणे आपण पहिल्यांदाच आमदार झाला आहात. पवार साहेबांकडुन काहीतरी शिखावं. पवारसाहेब कसं मोजकच बोलतात आणि करायचं ते करुन टाकतात. हा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय, जो सगळीकडे तोंड घालतो असा खोचक टोला मारत तुमच्या मतदारसंघाची अवस्था पाहा. 2024 ला निवडून यायचे वांदे आहेत. बायडन, पुतीन हे विषय सोडुन कर्जत जामखेड बघा. शक्ती कायदा सक्षम करुन त्याची अंमलबजावणी सुद्धा आमचं सरकार करेल आणि यानंतर महाविकास आघाडीचे दोन मंत्री आधी आत टाकू आणि ते आमच्या रेंजमध्ये असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

नितेश राणेंची ग्रामस्थांना धमकी ग्रामपंचायतीत जर सरपंच जिंकला नाही, तर एक रुपयाचाही निधी देणार नाही, अशी धमकी नितेश राणेंनी ग्रामस्थांना दिलीय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन राणेंवर टीकास्र डागलंय. ग्रामपंचायतीत राणेंच्या विचारांचा सरपंच न निवडल्यास एका रुपयाचाही निधी देणार नाही, अशी धमकी आमदार नितेश राणेंनी दिलीय. सिंधुदुर्गातल्या नांदगावातला हा व्हिडीओ आहे. ही धमकी समजा किंवा इतर काही. अशा शब्दांत राणे ग्रामस्थांशी बोलतायत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. त्यामुळे मतदानावेळी हे लक्षात ठेवा, असंही नितेश राणेंनी म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या