JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मैं झुकेगा नही' लागले बॅनर, बच्चू कडू यांनी रवी राणांना डिवचलं, करणार मोठी घोषणा?

'मैं झुकेगा नही' लागले बॅनर, बच्चू कडू यांनी रवी राणांना डिवचलं, करणार मोठी घोषणा?

रवी राणा यांनी केलेलं वक्तव्य मागे घेतलं असलं तरी बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा अजूनही कायम आहे.

जाहिरात

रवी राणा यांनी केलेलं वक्तव्य मागे घेतलं असलं तरी बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा अजूनही कायम आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 01 नोव्हेंबर : गुवाहाटीच्या वादावरून आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे आमदार व माजी मंत्री बच्चू कडू यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. पण, रवी राणा यांनी माघार घेतल्यानंतर आता बच्चू कडू यांच्या कार्यकर्ते चांगलेच फार्मात आले आहे. आज अमरावतीमध्ये मेळाव्यात ‘मैं झुकेगा नही’ असे पोस्टरर्स कार्यकर्त्यांनी झळकावून रवी राणांना डिवचलं आहे. आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्या वादावर बच्चू कडू आज कार्यकर्ता मेळाव्यानंतर आपली भूमिका मांडणार आहे. मात्र या मेळाव्या पूर्वी आ कडू यांचे “मै झुकेगा नहीच्या…. बॅनरने चर्चेला उधाण आले आहे.

(फडणवीसांनी केली कानउघडणी, रवी राणा ‘गुवाहाटी’वरून नरमले, व्यक्त केली दिलगिरी!)

५० खोके वरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेलं वक्तव्य मागे घेतलं असलं तरी बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा अजूनही कायम आहे. आज अमरावतीत होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बच्चू कडू आपली भूमिका, स्पष्ट करणार आहेत. (बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते, फडणवीसांचा गौप्यस्फोट, रवी राणा पडले तोंडघशी!) सोमवारी बच्चू कडू यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यात कार्यकर्ते 3 भूमिकेत असल्याचे संकेत दिले आहेत. सरकार मध्ये राहायचं, बाहेरून पाठिंबा घ्यायचा की तठस्थ राहायचं. या संदर्भात अधिकृत घोषणा बच्चू कडू करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कडू समर्थक आक्रमक झाले आहेत. ‘में झुकेगा नहीं’ अश्या आशयाचे बॅनर अमरावतीत झळकले आहे. सभास्थळी देखील कार्यकर्त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांची काय भूमिका असणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या