JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नगरपरिषद कार्यालयात वाढदिवस साजरा करणे भोवलं, नगरसेवकाला दणका

नगरपरिषद कार्यालयात वाढदिवस साजरा करणे भोवलं, नगरसेवकाला दणका

पोलिसांनी आता शर्मा यांच्यासह 6 जणांविरुद्ध साथ आपत्ती व्यवस्थापन आणि रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 28 जून : लॉकडाऊन आणि अनलॉक-1 मध्ये कुठलेही सार्वजनिकरित्या कार्यक्रम साजरे करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. मात्र असं असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांचे स्वीय सहायक आणि जळगाव जामोद नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य निलेश शर्मा यांना स्वतःचा वाढदिवस नगरपरिषदेत साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विरोधकांनी कारवाईसाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबविल्यानंतर पोलिसांनी शर्मा यांच्यासह 6 जणांविरुद्ध साथ आपत्ती व्यवस्थापन आणि रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. निलेश शर्मा हे भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. याशिवाय आमदार डॉ. संजय कुटे यांचे ते स्वीय सहाय्यक सुद्धा आहेत. हेही वाचा - कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर शर्मा यांनी नगर परिषद कार्यालयात कंत्राटदार आणि काही प्रतिष्ठित नागरिक बोलावून वाढदिवस साजरा केल्याचा आरोप आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना स्वीकृत नगरसेवक शर्मा यांनी शासनाच्या नियमांचा भंग केला. ही बाब समोर आल्यानंतर नगर पालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते अर्जुन घोलप यांच्यासह श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे, सौ. चित्राताई इंगळे, अ‍ॅड. संदीप मानकर या नगरसेवकांनी कारवाईसाठी दोन दिवसांपासून आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला होता. यावरून पोलिसांनी आता शर्मा यांच्यासह 6 जणांविरुद्ध साथ आपत्ती व्यवस्थापन आणि रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या