JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नंदुरबारमध्ये बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 17 गंभीर जखमी

नंदुरबारमध्ये बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 17 गंभीर जखमी

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. (Road Accident)

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नंदुरबार 30 सप्टेंबर : नंदुरबारमधील शहादा शहरातील एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात शहादा बायपास रस्त्यावर खासगी बस आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडल्याचं समोर येत आहे. पालघरमध्ये तरुणीवर झालेल्या गोळीबाराचा Live Video, मदत करण्याऐवजी वाटसरूने काढला पळ या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर येत आहे. शहादा तालुक्यातून रोजगारसाठी मजुरांचे स्थलांतर सुरू आहे. याच स्थलांतरादरम्यान झालेल्या अपघतात पाच जणांनी जीव गमावला आहे. मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी खासगी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. शहादा शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती की अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर पाच वर्षीय चिमुकली शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. वसईतल्या स्फोटाने तिघांचा जीव घेतला, सात जणांची रुग्णालयात झुंज सुरु, नेमकं काय घडलं? अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि घटनेची माहिती घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या