JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

आठवडी बाजारातून परत जात असताना हा अपघात झाला. यात राणीगाव मार्गे आकोटला पिकअप वाहन चाललं होतं. यावेळी घाटातून जात असताना वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती 04 ऑगस्ट : अमरावतीच्या मेळघाटातील राणीगाव घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे, तर इतर लोक किरकोळ जखमी झाले आहेत. आठवडी बाजारातून परत जात असताना हा अपघात झाला. यात राणीगाव मार्गे आकोटला पिकअप वाहन चाललं होतं. यावेळी घाटातून जात असताना वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. स्टंट करता करता रस्त्यावर कोसळला, बाईकने फरफटत नेलं; अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO जखमींना तातडीने धारणी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर रुग्णालया परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. याठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने अनेकदा अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. आठ दिवसांपूर्वीच मेळघाटमध्ये टेंबुरसोंडा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका क्रुझरला अपघात झाला होता. यात जवळपास 13 प्रवासी जखमी झाले होते. तसंच एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. सावधान! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल घाटातील रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यासोबतच प्रवास करण्यासाठी वाहनांची सोयही नसल्याने उपलब्ध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसतात. रस्त्याची दुरावस्था आणि अतिप्रवासी यामुळे अनेकदा नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या दोन्ही कारणांमुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यताही अधिक असते. यामुळे घाटात अनेकदा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या