चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.
अकोले, 30 ऑगस्ट: माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना महाराष्ट्रातील अकोल्यात घडली आहे. येथील दोन जणांनी एका निराधार वृद्ध महिलेच्या घरात शिरून अमानुष कृत्य केलं आहे. आरोपींनी निराधार वृद्ध महिलेच्या (destitute old woman) घरात शिरून तिची हत्या करत गळ्यातील दागिन्यांवर डल्ला (Murder and theft jewelry) मारला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत. कांताबाई तुकाराम जगधने असं हत्या झालेल्या निराधार वृद्ध महिलेचं नाव आहे. त्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आंभोळ येथील रहिवासी आहेत. त्यांची काळजी घ्यायला घरी कोणी नसून त्या आंभोळ शिवारात घरी एकट्याच राहतात. तर आरोपीही मृत महिलेच्या घरापासून काही अंतरावरच राहतात. सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, मृत कांताबाई यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या घराची कौलं बसवण्याचं काम गावातील एका व्यक्तीला दिलं होतं. हेही वाचा- लग्नानंतर 4 दिवसातच युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनेनं साताऱ्यात खळबळ संबंधित व्यक्तीनं कांताबाई यांच्या घराला कौलं बसवून दिली. पण त्याची नजर निराधार वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर पडली. दरम्यान शुक्रवारी आरोपी व्यक्तीनं आपल्या अन्य एका मित्राच्या मदतीनं वृद्ध महिलेचे दागिने लुटण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर आरोपींनी शुक्रवारी रात्री कोतूळ गावात मद्यपान केलं आणि रात्री उशीरा अंधाराचा फायदा घेत कांताबाईंच्या घरात शिरले. हेही वाचा- पुण्यात ‘स्पेशल 26’ थरार; सराफाला 30 तोळे सोन्यासह 20 लाखांना लुटलं यानंतर आरोपींनी कोणालाही काही कळायच्या आत कांताबाईंची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने घेऊन दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही तासांताच पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. अकोले आणि राजूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलीस दोघांची चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.