JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / क्षणभराचा आनंद जीवावर बेतला; झोका खेळताना जळगावातील 18 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयानक

क्षणभराचा आनंद जीवावर बेतला; झोका खेळताना जळगावातील 18 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयानक

झोका खेळताना एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. झोका खेळताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने या तरुणीचा मृत्यू झाला आहे

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदुरकर, जळगाव 01 डिसेंबर : अनेकदा क्षणभराचा आनंद जीवावर बेतल्याच्या घटना समोर येत असतात. झोका खेळताना काहीतरी दुर्घटना होऊन मृत्यू झाल्याच्या तर कित्येक घटना आपण ऐकतो. झोका खेळताना अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. मात्र बऱ्याचदा फक्त लहान मुलंच नाही तर अगदी तरुणही अशा घटनांमध्ये जीव गमावतात. अशीच एक धक्कादायक घटना जळगावमधून समोर आली आहे. यात्रेतील 12 गाड्या ओढताना अचानक चाक अंगावरुन गेलं अन्.. जळगावमधील घटना यात झोका खेळताना एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. झोका खेळताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने या तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात घडली. विधी स्वप्निल पाटील असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. विधी पाटील ही तरुणी आपल्या राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर झोका खेळत होती. मात्र पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काय घडणार आहे, याची कल्पनाही तिला नव्हती. झोका खेळताना अचानक दोर तिच्या गळ्यात अडकला. या घटनेत गळफास लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक! शेतात बैल घुसल्याने भडकले काका; जळगावातील पुतण्याचा थेट जीवच घेतला दरम्यान, जळगावमधून आणखी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. यात एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज यांची यात्रा भरते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ध्वज काठीची धनगर मढी पासून विधिवत पूजा करून भगत समाधान भगवान पाटील यांचे सह इतर नागरिकांनी बारा गाड्या ओढण्यास सुरुवात केली. बारा गाड्यांच्या साईडला असलेल्या चाकांकडून इतर युवक आणि नागरिक हे या बारा गाड्यांना पुढे ढकलत होते. दुर्दैवाने बारागाड्या ओढाताना बैलगाडीचे चाक अंगावरुन गेल्याने राहुल पंडित पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या