JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, उद्योजकता वाढवण्यावर सरकारचा भर

14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, उद्योजकता वाढवण्यावर सरकारचा भर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Second Wave) राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts with lower corona cases) पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जुलै: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Second Wave) राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts with lower corona cases) पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्णदर 1 टक्क्यांपेक्षाही (1 percent) कमी आहे, अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असे 14 जिल्हे (14 districts) असून त्यांची यादी आरोग्य विभागानं मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे. हे आहेत निकष ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सलग तीन आठवड्यांपासून 1 टक्क्यांच्या खाली असेल, अशा जिल्ह्यांना हा दिलासा मिळणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच उद्योजकता वाढावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, असा दावा आरोग्य मंत्रालयानं मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित केली जाईल आणि ती जाहीर केली जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे कोरोनाचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत नसल्याचं चित्र आहे. 18 ते 24 जुलैच्या कालावधीत सांगलीतील कोरोनाचा दर हा 9.1 टक्के इतका आहे. त्याखालोखाल सातारा 8.2, सिंधुदुर्ग 8, पुणे 7.4, कोल्हापूर 6.3 तर अहमदनगर 6.2 अशी नोंद करण्यात आली आहे. मुंबईचा दर 2.3 टक्के असल्यामुळे लोकल सुरु करण्याबाबत पुनर्विचारच सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र ज्या भागात कोरोनाचा दर सलग तीन आठवडे 1 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे, तिथे लॉकडाऊन संपण्याची चिन्हं आहेत. हे वाचा - कर्नाटकला आजपासून मिळाले नवे मुख्यमंत्री; कशी होती बसवराज यांची राजकीय कारकीर्द 14 जिल्ह्यांमधील कोरोनाचे निर्बंध उठवण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या