'सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का?'
रत्नागिरी, 06 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. तर, महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, असा गौप्यस्फोटच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी धक्कादायक दावाही केला. (गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा ‘नटी’ म्हणून उल्लेख) मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे, असा दावाच सामंत यांनी केला. (पदयात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा; भारत जोडायचा असेल तर.. प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला) महाविकास आघडीत काय आलबेल ते आज पुढे आले आहे. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट सवालच सामंत यांनी विचारला आहे. विरोधकांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही - विजय शिवतारे दरम्यान, राज्यात असणारे भाजप शिंदे गटाचे सरकार हे केव्हाही कोसळणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येतंय. त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘विरोधक हे दिवा स्वप्न पाहत आहेत. ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून पवार साहेब हे राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत. त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कदापि पूर्ण होणार नसल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय.