संशोधनानुसार पहिल्या बाळानंतर दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये किमान 18 महिन्यांचं अंतर असायला हवं. हेल्थ एक्सपर्ट सुद्धा हाच सल्ला देतात. त्यांच्यामते किमान 18 ते 24 महिन्यांचं अंतर दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये असायला हवं. कमी काळात दुसरी प्रेग्नेंसी झाली तर, बाळाच्या वाढीवर आणि वजनवर परिणाम होतो.
वॉशिंग्टन, 08 जुलै : आपल्याला मूल (Child) असावं असं प्रत्येक दाम्पत्याचं स्वप्नं असतं. फक्त दाम्पत्यच नाही तर अगदी सिंगल महिला किंवा पुरुषालाही मूल हवंहवंसं वाटतं. मुलांसाठी पालक काहीही करायला तयार होत नाही. ज्यांना नैसर्गिकरित्या मूल होत नाही त्यांना आव्हीएफमार्फत मूल होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एका सिंगल महिलेनंही आई होण्यासाठी आयव्हीएफचा (IVF) मार्ग निवडला त्यावर आपली आयुष्यभराची पुंजी खर्च केली. पण तिला झालेलं मूल हे डाऊन सिंड्रोम (Down sydrome) होतं. अमेरिकेतील (America) अरिझोना येथे राहत असलेली 40 वर्षांची मिशेल एलिजागा (Michelle Eliza Ga) ही महिला आपल्या आयुष्यात योग्य व्यक्ती येण्याची वाट पाहून कंटाळली होती. त्यामुळे आपल्या मैत्रिणींसोबत आपला चाळीसावा वाढदिवस साजरा केल्यानंतर आयव्हीएफमार्फत बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. मिशेलने स्पर्मची (Sperm) एक कुपी खरेदी करण्यासाठी स्वतःकडील सर्व सेव्हिंग (Savings) खर्च केली आणि जून 2019 मध्ये तिची गर्भधारणा झाली. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, आता आपल्याला कोणीही जोडीदार मिळू शकत नाही, असं मिशेलला वाटत असून, ती आपला सर्ववेळ मॅथ्यू या आपल्या बाळासोबत व्यतीत करते. मात्र मॅथ्यूला डाऊन सिंड्रोम (Down syndrome) आहे. मी जगासाठी कोणताही बदल करु इच्छित नाही. तसेच अन्य कोणत्या गोष्टीची कल्पनाही करु शकत नाही, असे मिशेल सांगते. हा माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारा अनुभव आहे. मी माझी क्षमता आणि ताकदीमुळे आश्चर्य चकीत झाल्याचे मिशेल सांगते. हे वाचा - Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि… डेली मेलच्या रिपोर्टनुसार मिशेल म्हणाली, एक आदर्श पुरुष माझ्या आयुष्यात येईल आणि माझे कौटुंबिक जीवन सुरू होईल असं स्वप्न पाहण्यात मी खूप वर्षे घालवली. माझा 40 वा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी मित्र-मैत्रीणींसोबत मी कोस्टारिकाला गेली होते. या वर्षीतरी माझ्या स्वप्नातील पुरुष मला भेटेल असा मला विश्वास वाटत होता. मला कुटुंब तयार करायचं होतं. पण आता वेळ फार कमी राहिली आहे, असं मला जाणवलं. त्याचवेळी मूल जन्माला घालण्याचं नियोजन माझ्या डोक्यात आलं. माझं लग्न झालं नाही. तसंच सीरियस लव्ह रिलेशनशीप (Relationship) संपुष्टात येऊनही बराच काळ लोटला होता. लग्न करावं असं मला नेहमीच वाटत असे. पण मी एक उत्तम आई होऊ शकते, असा विश्वास मला होता" आपल्याला आई व्हायचं आहे ही इच्छा मिशेलने आपल्या मैत्रिणीसमोर बोलून दाखवली. ही वेळ हातातून जाऊ नये, याची भीतीही तिला वाटत होती. यावर तिच्या मैत्रिणीने तिला आयव्हीएफचा मार्ग सुचवला. हे वाचा - Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि… ही प्रक्रिया अत्यंत महागडी असते, याची माहिती मिशेलला नव्हती. तिच्याकडे सेव्हिंग्ज चे 5 हजार डॉलर शिल्लक होते. अशा वेळी तिने आययूआय (IUI) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. इथं स्पर्म थेट एका स्त्रीच्या गर्भात सोडण्याची प्रक्रिया केली जाते. हाच सर्वात किफायतशीर पर्याय होता आणि ती एका स्पर्म डोनरच्या एक कुपी शुक्राणूंसाठी खर्च करू शकणार होती. मिशेलने सांगितलं, की एका प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्हाला अजून स्पर्म खरेदी करावे लागतील. मात्र मी हे सर्व वहन करू शकत असल्याने मला या प्रक्रियेवर विश्वास होता. 2 आठवड्यानंतर मी उत्सुकतेने पहाटे 3 वाजता उठले आणि प्रेग्नसी टेस्ट (Pregnancy Test) केली. ही टेस्ट सुदैवाने पॉझिटिव्ह आली. मला क्षणभर धक्का बसला परंतू मी खूप खूश झाले. मिशेलचे वय जास्त असल्याने तिला 12 व्या आठवड्यात प्रेग्नसीतील प्रीनेटल टेस्ट करावी लागली. तेव्हा तिला तिचं मूल डाऊन सिंड्रोम असल्याचंही समजलं आणि तिला धक्काच बसला. मला असं मूल होईल या कल्पनेने मी दिवसभर रडत होते. माझ्याकडे गर्भधारणा टाळण्याचा दुसरा मार्ग नव्हता. मला डाऊन सिंड्रोमची काहीही माहिती नव्हती. त्यामुळे माझ्या गर्भधारणेतील उरलेला वेळ याबाबत माहिती घेण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. गर्भधारणेनंतर आपत्कालीन सी-सेक्शन झाले आणि मी मॅथ्यूला जन्म दिला आणि ती सिंगल मदर झाली. हे वाचा - तुमचं बाळ अजूनही बोलत नाही? Tongue Tie असू शकतं कारण मिशेल म्हणाली, “मी जेव्हा शस्त्रक्रिया झाल्यावर बाहेर आले तेव्हा मॅथ्यूला एनआयसीयूमध्ये ठेवल्याचं पाहिलं. तो सुखरूप आहे आणि खूप सुंदर आणि तुमच्या सारखाच दिसतो, असं मला नर्सने सांगितलं. त्यानंतर काही वेळाने मी त्याला भेटण्यासाठी गेले. तो माझ्यासाठी सर्वात चांगला क्षण होता. घरी येण्यापूर्वी 2 महिने मॅथ्यू एनआयसीयू (NICU) मध्ये होता. हा प्रवास खूप दिर्घकाळाचा होता. अपारंपारिक पद्धतीने मी मॅथ्यूचे स्वागत केलं याचा मला कोणाताही पश्चाताप नाही. मात्र मी सिंगल मदर (Single Mother) असल्याने हे सारे खूप थकवणारे आणि कठीण आहे” “मॅथ्यू हा उत्साही आणि प्रफुल्लित मुलगा आहे. त्याची आई झाल्याने मी स्वतःचे आभार मानते. डाऊन सिंड्रोम असलेल्या माझ्या मुलासाठी मला जे शक्य आहे ती सर्व करण्याचे नियोजन करीत असल्याचे मिशेलने सांगितलं.